Join us  

भात गिचका, पुऱ्या तेलकट; चपात्या फुलत नाही? १० सोप्या किचन टिप्स; चवदार होईल स्वयंपाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 8:10 PM

10 Kitchen Tricks and Tips From Our Test Kitchen : सोप्या पाककला टिप्स; मिनिटात वाढेल जेवणातली रंगत

स्वयंपाक करण्याचा छंद अनेकांना असतो. पण बऱ्याचदा मनासारखा पदार्थ तयार होत नाही (Kitchen Tips). साहित्याचे प्रमाण चुकतं. ज्यामुळे पदार्थात कोणतीतरी कमतरता जाणवते (Cooking Tips). किंवा पदार्थ करण्याची पद्धत चुकते, अशावेळीही पदार्थाची चव बिघडते. आपण म्हणतो, आईच्या हाताची चव कोणाच्या हाताला नाही. पण ही चव नेमकी पदार्थामध्ये उतरते कशी? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला देखील पडला असेल.

जर आपल्याला पाककलेतला 'प' देखील येत नसेल, किंवा पदार्थ करण्याची पद्धत चुकत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. पदार्थ होईल चवदार; शिवाय स्वयंपाक करण्याचीही आपल्याला गोडी लागेल(10 Kitchen Tricks and Tips From Our Test Kitchen).

स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

- पराठे चविष्ट व्हावे म्हणून पिठात उकडलेला बटाटा घाला. कणिक सैलसर मळू नका.

मुलांच्या बळकट हाडांसाठी फक्त दूध पुरेसं नाही, चमचाभर ‘ही’ पावडर दुधात घाला, हाडं होतील मजबूत

- पराठे भाजताना तेल किंवा तुपाचा वापर करू नका. बटरचा वापर करा.

- ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी त्यात भाजलेल्या चण्याचे पीठ घाला. यामुळे भाजीची चव वाढेल.

- भजी करताना बॅटरमध्ये थोडे तेल घाला. यामुळे भजी कुरकुरीत होतील.

- न्यूडल्स शिजत घालताना पाण्यात थोडे मीठ आणि तेल घाला. नंतर शिजलेल्या न्यूडल्समध्ये थंड पाणी घाला, आणि धुवून घ्या. न्यूडल्स चिकटणार नाही.

- डाळ शिजत घालताना काही वेळानंतर मीठ घाला. यामुळे डाळी व्यवस्थित शिजतील.

- पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी कणकेत एक चमचा रवा किंवा तांदुळाचे पीठ घाला.

आत्ताच्या आता गरम डोसा खाण्याची इच्छा झाली. करा इन्स्टंट डोसा गव्हाच्या पिठाचा, पाहा रेसिपी

- पनीर कडक झाले असतील तर, कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पनीर ठेवा. काही वेळानंतर पनीर मऊ होतील.

- भात शिजत घालताना त्यात थोडे लिंबाचा रस घाला. यामुळे भात मोकळा आणि पांढरा होतो.

- कांदे भाजताना किंवा तळताना त्यात थोडी साखर घाला. यामुळे कांदे लवकर भाजला जाईल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स