Join us  

विकेंडला कपभर पोह्याचे करा पौष्टीक अप्पे; हेल्दी रेसिपी १० मिनिटात गुबगुबीत अप्पे रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 10:00 AM

10 mins Breakfast Recipe | 1 Cup Poha - Instant Breakfast Appe Recipe : कुरकुरीत पोह्याचे इंस्टंट अप्पे कधी खाऊन पाहिलं आहे का?

नाश्त्याला रोज काय बनवावं हा विचार करून खूप कंटाळा येतो (Appe). पोहे, उपमा, इडली, चपाती - भाजी, डोसे, मेदू वडे या व्यतिरिक्त पौष्टीक नाश्त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन नाही (Cooking Tips). जर आपल्याला हटके आणि युनिक पदार्थ नाश्त्यामध्ये खायचं असेल तर, पोह्याचे इंस्टंट अप्पे ट्राय करून पाहा (Breakfast Recipe). हे अप्पे तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही.

काळी वेळात पौष्टीक अप्पे तयार होतील. शिवाय चवीलाही भन्नाट लागतील. डाळ - तांदुळाचे अप्पे आपण खातोच. शिवाय त्याच प्रकारचे अप्पे खाऊन कंटाळाही येतो. जर आपल्याला वेगळ्या पद्धतीचे अप्पे खाऊन पहायचं असेल तर, पोह्याचे अप्पे नाश्त्यासाठी बेस्ट आहे. कपभर पोह्यामध्ये भरपूर अप्पे तयार होतील(10 mins Breakfast Recipe | 1 Cup Poha - Instant Breakfast Appe Recipe).

अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

रवा

दही

मोहरी

जिरं

कडीपत्ता

हिंग

लाल तिखट

निकाल लागले, टेन्शन कमी झालं आता प्या मन आणि शरीराला थंडावा देणारं ताडगोळ्याचं सरबत; पाहा सोपी कृती..

हळद

मीठ

कोथिंबीर

अशा पद्धतीने करा पोह्याचे अप्पे

पोह्याचे कुरकुरीत अप्पे करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप पोहे घ्या. त्यात पाणी घालून पोहे धुवून घ्या. नंतर पुन्हा त्यात पाणी घालून भिजत ठेवा. पोहे भिजल्यानंतर हाताने मॅश करा. नंतर त्यात एक वाटी रवा, दही आणि अर्धा ग्लास पाणी ओतून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा.

काय सांगता, वांग्याची भजी कधीच खाल्ली नाही? पाहा रेसिपी, खा कुरकुरीत चविष्ट भजी

एका पॅनमध्ये एक चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता, अर्धा चमचा हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला गाजर, एक चमचा लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. तयार मिश्रण बॅटरमध्ये ओतून मिक्स करा. हवं असल्यास आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. शेवटी एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घालून मिक्स करा.

दुसरीकडे अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. ब्रशने तेल लावून अप्पे पत्र ग्रीस करा. त्यात चमचाभर बॅटर ओता. त्यावर झाकण ठेवा. दुसऱ्या बाजूने देखील अप्पे भाजून घ्या. अशा प्रकारे हेल्दी पोह्याचे इंस्टंट अप्पे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स