Join us  

फक्त २० मिनिटांत करा १ कप रव्याचे मोदक, फ्रिजमध्ये १० दिवसही टिकणाऱ्या मोदकांची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 7:40 PM

Rava Modak Recipe : मोदक केले आणि खूप गोड पदा‌र्थांत ते उरले तर काय असं टेंशन येत असेल तर हे रव्याचे मोदक करुन पाहा...

आता काही तासांतच आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे आगमन झाले म्हणजे रोजच्या आरत्या, पूजा, जेवणाच्या पंगती ओघाने आल्याचं. गणपतीची रोज आरती झाल्यावर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून प्रसाद देण्याची पद्धत आपल्याकडे असते. गणपतीसाठी पाहुणे घरी आल्यावर त्यांच्यासाठी रोज आरती झाल्यावर प्रसाद काय करावा असा घरच्या गृहिणीला प्रश्न पडतो. गणपतीचे १० दिवस नेमका कोणता प्रसाद करायचा, रोज नवीन काय पदार्थ बनवावा यात गृहिणींचा गोंधळ उडतो. त्यातही जर घरची गृहिणी ही वर्किंग वुमन असेल तर, कामाच्या गडबडीत प्रसादाला रोज काय बनवावे या विचाराने तिची तारांबळ उडते. अशावेळी काहीतरी झटपट होणारा, दीर्घकाळ टिकणारा असा एखादा प्रसादाचा पदार्थ बनवावा असे प्रत्येकीला वाटते(Ganesh Chaturthi Special : How To Make Rava Modak).

या सण - उत्सवा दरम्यान, घरच्या गृहिणींची कामाची रोज धावपळ तर असतेच. यात नैवेद्य - प्रसाद म्हणून तयार होणाऱ्या मोदकांची भर (Instant Rava Modak Recipe) असतेच. पूर्वीच्या काळी एक-दोन प्रकारचेच मोदक बनवले जायचे परंतु काळानुसार त्यात बदल होत गेले. आपण पारंपारिकतेला अधुनिकतेचा साज देत वेगळेपण जपुन मोदकाचे (10-Minute Instant Modak Recipe with Special Filling) नवनवीन प्रकार बनवू लागलो. कामाच्या गडबडीत किंवा वर्किंग वुमन असल्यामुळे रोज नवीन प्रसाद (No Steam Rava Modak Recipe) बनवणे शक्य होत नाही. अशावेळी आपण घरी असणाऱ्या मोजक्याच साहित्याचा वापर करून झटपट तयार होणारे, दीर्घकाळ टिकणारे रव्याचे मोदक (Semolina Modak Recipe) बनवून ठेवू शकतो. रव्याच्या मोदकांची झटपट होणारी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. मोदकाची पारी बनवण्याचे साहित्य :-  

१. बारीक रवा - १ कप २. साजूक तूप - ४ ते ५ टेबलस्पून ३. दूध - पाव कप ४. केसर - ६ ते ७ काड्या ५. पिठीसाखर - १ कप ६. वेलची पावडर - पाव टेबलस्पून ७. ड्रायफ्रुटसचे काप - २ टेबलस्पून 

२. सारण बनवण्यासाठीचे साहित्य :- 

१. काजू - १० ते १२२. बदाम - १० ते १२३. पिस्ता - १० ते १२४. डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबर - २ टेबलस्पून ५. बारीक किसून घेतलेला गूळ - २ टेबलस्पून 

सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात रवा घालून तो ७ ते ८ मिनिटे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. २. त्यानंतर त्यात केसर भिजवून घेतलेले सायीसहित दूध घालून घ्यावे. ३. दूध घातल्यानंतर पुन्हा रवा २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावा. ४. आता या मिश्रणात पिठीसाखर व वेलची पावडर घालून सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

गणपतीचे आवडते गूळ खोबरे खाण्याचे १० फायदे, देवाला नैवेद्य आपल्याला पौष्टिक प्रसाद...

५. सगळ्यात शेवटी या मिश्रणात ड्रायफ्रूट्सचे बारीक काप घालून घ्यावे. मग हे मिश्रण एका डिशमध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवावे. ६. आता एका मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता, डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबर, बारीक किसून घेतलेल गूळ घालून मोदकाचे सारण बनवून घ्यावे. ७. मोदक तयार करण्यासाठी आतील सारणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. ८. साच्याला तूप लावून सर्वप्रथम त्यात रव्याचे सारण भरुन त्याला हाताने दाब देऊन गोलाकार बनवून घ्यावे, मग त्यात पुरणाचा एक गोळा घालूंन घ्यावा, ९. सगळ्यात शेवटी मोदकाच्या तळाशी रव्याचे सारण भरुन मोदक तयार करुन घ्यावेत. 

नैवेद्यासाठी आणलेली केळीची पाने लगेच खराब होतात ? १ सोपी ट्रिक, १० दिवस केळीची पाने राहतील हिरवीगार...

 दीर्घकाळ टिकणारे व झटपट तयार होणारे मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणेश चतुर्थी रेसिपी