Lokmat Sakhi >Food > मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड

मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड

10-Minute Peanut Chutney Recipe For Idli/Dosa घरात नारळ नसेल तर चटणी कशाची करायची असा प्रश्न पडतो, त्यासाठीच ही खास चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 12:35 PM2023-07-25T12:35:49+5:302023-07-25T12:36:35+5:30

10-Minute Peanut Chutney Recipe For Idli/Dosa घरात नारळ नसेल तर चटणी कशाची करायची असा प्रश्न पडतो, त्यासाठीच ही खास चटणी

10-Minute Peanut Chutney Recipe For Idli/Dosa | मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड

मूठभर शेंगदाण्याची करा झणझणीत ओली चटणी! इडली-डोसा-पराठ्यांसोबत अशी चटणी म्हणजे नाश्ता फक्कड

चटणी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतो. चटकदार चवीची चटणी, अनेक पदार्थांसोबत खाल्ली जाते. जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. चटणी दोन प्रकारची केली जाते. काहींना ओली चटणी आवडते, तर काहींना सुकी चटणी आवडते. खोबऱ्याची, तिळाची, मिरचीची चटणी आपण खाल्लीच असेल, पण आपण कधी शेंगदाण्याची चटणी खाऊन पहिली आहे का?

शेंगदाण्याची सुकी आणि ओली दोन्ही प्रकारे चटणी तयार केली जाते. जर आपल्याला खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल, तर आपण शेंगदाण्याची ओली चटणी करून पाहू शकता(10-Minute Peanut Chutney Recipe For Idli/Dosa).

शेंगदाण्याची ओली चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

शेंगदाणे

लाल सुक्या मिरच्या

हिरवी मिरची

काळी मिरी

उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत इन्स्टंट वडे, शिळ्या भाताला द्या नवे खमंग रंगरुप

जिरं

चिंच

साखर

मीठ

कोथिंबीर

पाणी

कृती

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात मुठभर शेंगदाणे व लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या, शेंगदाणे व लाल सुक्या मिरच्या भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, एक हिरवी मिरची, ४ ते ५ काळी मिरी, अर्धा चमचा जिरं, चिंच, चवीनुसार साखर - मीठ, कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा.

खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

चटणी तयार करताना आपण त्यात गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करू शकता. अशा प्रकारे इडली - डोश्यासोबत, किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चमचमीत ओली चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: 10-Minute Peanut Chutney Recipe For Idli/Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.