Join us  

आहारतज्ज्ञ सांगतात, लसूण चिरुन फोडणीत टाकण्यापूर्वी 'हे' काम करा, तरच लसणाचे फायदे मिळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2024 3:13 PM

Proper Method Of Using Lasun In Cooking: लसूण चिरल्यानंतर लगेच फोडणीत किंवा स्वयंपाकात वापरू नये. त्यापुर्वी १० मिनिटांचा एक नियम पाळा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. (10 minutes rule about garlic)

ठळक मुद्देम्हणूनच लसूण सोलून, चिरून झाल्यावर काय करायचं आणि त्यामुळे नेमके काय फायदे होतात ते पाहूया...

लसूण हा असा एक पदार्थ आहे जो कोणत्याही पदार्थाला खमंगपणा आणू शकतो. लसूणाची खमंग, कडकडीत फोडणी एखाद्या पदार्थाला घातली की त्या पदार्थाची चव, स्वाद सगळंच कसं खुलून येतं. त्यामुळे आपल्या रोजच्या स्वयंपाकात तर बऱ्याचदा लसूण असतोच. आता एखाद्या पदार्थात जेव्हा लसूण घालायचा असतो तेव्हा आपण तो सोलून घेतो, चिरतो आणि मग लगेच फोडणीत किंवा अन्य पदार्थांमध्ये टाकून देतो. पण असं करू नका (10 minutes rule about garlic), असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. म्हणूनच लसूण सोलून, चिरून झाल्यावर काय करायचं आणि त्यामुळे नेमके काय फायदे होतात ते पाहूया... (proper method of using lasun in cooking)

 

स्वयंपाकात लसूण वापरण्याची योग्य पद्धत

स्वयंपाक करताना लसूण नेमका कोणत्या पद्धतीने वापरावा, याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लसूणाच्या '10 minute rule' विषयी माहिती दिली आहे.

केस रंगवूनही महिनाभरातच पुन्हा पांढरे होतात? १ मस्त उपाय, किमान २ महिने केस राहतील काळेभोर 

त्यांनी असं सांगितलं आहे की लसूणामध्ये ॲलिसीन (Allicin) नावाचं एक कम्पाउंड असतं. लसूण खाल्ल्याने शरीराला जे लाभ होतात, ते बहुतांश लाभ ॲलिसीन या घटकामुळेच होतात.

लसूणामधलं ॲलिसीन ॲक्टीवेट होण्यासाठी काही मिनिटांची गरज असते. म्हणजेच आपण लसूण चिरतो तेव्हा त्यानंतर काही मिनिटांनी ॲलिसीन ॲक्टीव्हेट होतं आणि ते ॲक्टीवेट झाल्यानंतरच त्याचा लाभ शरीराला होतो.

 

पण आपण जेव्हा लसूण चिरून लगेच तो फोडणीला घालतो, तेव्हा ॲलिसीन डिॲक्टीव्हेट होतं आणि लसूण खाण्याचा म्हणावा तसा लाभ शरीराला होत नाही. त्यामुळे लसूण चिरल्यानंतर किमान १० मिनिटे थांबा. तो लगेच फोडणीत घालण्याची घाई करू नका. 

डोकं सारखं ठणकतं? डॉक्टर सांगतात ५ गोष्टी, मायग्रेनचा त्रास कमी होऊन मिळेल आराम

हवं तर त्यासाठी थोडं आधीच नियोजन करून ठेवा. पण लसूण चिरून तो काही तास तसांच फ्रिजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तो वापरायचा असं मात्र करू नका. कारण यामुळे लसूण खाण्यायोग्य राहात नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती