शेंगदाणे हा प्रकार सगळ्यांच्या विशेष आवडीचा. मग ते खारे शेंगदाणे असो किंवा मसालेदार, एकदा खाल्ले की सतत खातच राहावेसे वाटतात. बरेचदा आपण टाईमपास म्हणून (10 Minutes Salted Peanuts Recipe) किंवा संध्याकाळच्या टी - टाईमला स्नॅक्स म्हणून शेंगदाणे मोठ्या आवडीने खातो. असे हे खारे शेंगदाणे (Khare Shengadane) बाहेर ठेल्यावर अगदी सहज विकत मिळतात परंतु हे ५ ते १० रुपयांच्या पुडीतील शेंगदाणे पुरवठ्याला येत नाही. ते लगेच खाऊन संपतात अशावेळी आपल्या जिभेला या खाऱ्या शेंगदाण्याची चटक लागलेली असते(How to make salted peanuts at home).
अशावेळी भरपूर शेंगदाणे मुठीत घेऊन खाण्याची इच्छा होतेच, अशा परिस्थितीत, आपण हे खारे शेंगदाणे घरच्याघरीच देखील तयार करु शकतो. खारे शेंगदाणे म्हटल्यावर भरूचला मिळणारे खारे शेंगदाणे (Street Style Salted Peanuts) डोळ्यासमोर येतात, पण ते घरी तयार करायचे असतील तर फार कष्ट पडत नाहीत फक्त पुरेसा वेळ मात्र द्यावा लागतो. तेव्हा भरुच स्पेशल खारे शेंगदाणे घरच्याघरी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. शेंगदाणे - १ किलो २. पाणी - गरजेनुसार ३. मीठ - गरजेनुसार
हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...
कपभर मटार - पोह्यांची करा कुरकुरीत क्रिस्पी टिक्की, रविवार सकाळचा ब्रेकफास्ट होईल झक्कास...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. २. पाणी उकळल्यानंतर त्यात शेंगदाणे घालावेत. ३. शेंगदाणे व्यवस्थित ५ ते १० मिनिटे उकळवून घेतल्यानंतर ते एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावेत. पाणी गाळून फक्त शेंगदाणे एका वेगळ्या भांड्यात काढवेत.
४. आता एक मोठी कढई घेऊन त्यात पाणी घ्यावे ते पाणी चांगले गरम होऊ द्यावे. आता शेंगदाणे एका पसरट चाळणीत घेऊन व्यवस्थित पसरवून घ्यावेत. मग या शेंगदाण्यात चवीनुसार मीठ घालावे. आणि ही गाळणी २ ते ३ मिनिटांसाठी गरम पाण्याच्या कढईवर ठेवून द्यावी. ५. आता एका कढईत कपभर मीठ घेऊन त्यात हे शेंगदाणे ओतून हलकेच परतून घ्यावे. मग चाळणीने चाळून जास्तीचे मीठ काढून घ्यावे.
गरमागरम भरुचची खासियत असलेले खारे शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत. हे खारे शेंगदाणे एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करून ठेवावे.