सकाळचा नाश्ता हा मुख्य असतो. कारण यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. महाराष्ट्रात अनेक लोकं नाश्त्याला चपाती खाण्यास प्राधान्य देतात. पण सध्या पराठ्याचा खवय्यावर्ग वाढत चालला आहे. पराठा वेगवेगळ्या भाज्या भरून तयार करण्यात येतो. त्यात आलू पराठा फार फेमस आहे. प्रत्येक घरात आलू पराठा हमखास केला जातो. आलू पराठा करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे.
काही लोकं पिठात बटाट्याची भाजी मिक्स करतात. तर काही सारणाप्रमाणे बटाट्याची भाजी भरून पराठे तयार करतात. पण जर आपल्याला मेहनत न घेता, वेळ वाचवून पराठे तयार करायचे असतील तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. आपण पीठ न मळता पराठे तयार करू शकता, ते कसे पाहूयात(10minute Liquid Dough Aloo Paratha | No Kneading - No Rolling Aloo Paratha Recipe).
आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य
उकडलेले बटाटे
कांदा
गाजर
हिरवी मिरची
लसूण
आलं
जिरं
ओवा
चिली फ्लेक्स
ओरेगॅनो
छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू
काळी मिरीपूड
गरम मसाला
गव्हाचं पीठ
मीठ
कोथिंबीर
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी बारीक किसलेला गाजर, ४ ते ५ बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, एक टेबलस्पून आलं, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून ओवा, एक टेबलस्पून चिली फ्लेक्स, एक टेबलस्पून ओरेगॅनो, अर्धा टेबलस्पून काळी मिरीपूड, एक टेबलस्पून गरम मसाला, २ कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर घालून साहित्य एकजीव करा. त्यानंतर त्यात ३ कप पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी पीठ तयार करतो, त्याच प्रमाणे बॅटर तयार करा.
युज ॲण्ड थ्रोवाले प्लास्टिक कप फेकू नका; ४ स्मार्ट उपयोग-प्लास्टिक कचराही होईल कमी
पराठा तयार करण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात ब्रशने तेल लावून ग्रीस करा. त्यावर चमच्याने बॅटर पसरवा. नंतर ३ ते ४ मिनिटांसाठी झाकण ठेवा. दोन्ही बाजूने पराठा भाजून घ्या. अशा प्रकारे झटपट खमंग आलू पराठा खाण्यासाठी रेडी.