Lokmat Sakhi >Food > 11 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर होतात खराब; फ्रीजमधे काय ठेवू नये?

11 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर होतात खराब; फ्रीजमधे काय ठेवू नये?

फ्रीज स्वयंपाकघरात असणं आवश्यक हे बरोबर पण स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट फ्रीजमधे चांगली राहील असं नाही. काही गोष्टी  फ्रीजबाहेरच चांगल्या राहातात, सामान्य तापमानात भरपूर दिवस टिकतात आणि त्या खराब होतात त्या केवळ फ्रीजमधे ठेवून, फ्रीजमधल्या अति थंड तापमानामुळे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 02:49 PM2022-02-04T14:49:54+5:302022-02-04T15:29:11+5:30

फ्रीज स्वयंपाकघरात असणं आवश्यक हे बरोबर पण स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट फ्रीजमधे चांगली राहील असं नाही. काही गोष्टी  फ्रीजबाहेरच चांगल्या राहातात, सामान्य तापमानात भरपूर दिवस टिकतात आणि त्या खराब होतात त्या केवळ फ्रीजमधे ठेवून, फ्रीजमधल्या अति थंड तापमानामुळे.

11 Things get worse when stored in the fridge; What not to keep in the fridge? | 11 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर होतात खराब; फ्रीजमधे काय ठेवू नये?

11 गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर होतात खराब; फ्रीजमधे काय ठेवू नये?

Highlightsचवीला आंबट असणारी संत्री मोसंबी सारखी फळं फ्रीजमधे ठेवू नये. फ्रीजमधील तापमानामुळे या फळांच्या चवीची आणि पोताची हानी होते. फ्रीजमधे मध ठेवल्यास ते घट्ट होतं. फ्रीजमधे टमाटे ठेवल्यास ते बाहेरुन चांगले दिसतात पण आतून खराब झालेले, चवीने नासलेले लक्षात येतात.  

फ्रीज ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक बाब. एखादी गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली की चिंता नाही असं वाटतं. पण फ्रीज म्हणजे जादूची कांडी नव्हे की त्यात कितीही गोष्टी, कशाही ठेवल्या तरी चांगल्याच राहातील? अनेक घरातील स्वयंपाकघरात फ्रीज एखाद्या कपाटासारखा वापरावा तसा काहीही आणलं की ठेवा फ्रीजमधे असा पध्दतीने वापरला जातो. फ्रिजमध्ये अन्नपदार्थ टिकतात हे खरं असलं तरी ही बाब सर्वच खाद्यपदार्थांबाबत एकसारखी लागू पडत नाही. महिनोमहिने एखादा पदार्थ फ्रीजमधे पडून राहिला तर तो खराब झालेला लक्षात येतो. यावरुन कमी कालावधीसाठी अन्नपदार्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून फ्रीज असतो, हे लक्षात घ्यावं.

Image: Google

विशिष्ट काळापेक्षा शिजवलेले, न शिजवलेले पदार्थ फ्रीजमधे ठेवल्यास त्या पदार्थांची मूळ चव, पोत आणि स्थिती बदलते तर काही पदार्थांच्या बाबतीत ती बिघडलेली लक्षात येते. फ्रीज  स्वयंपाकघरात असणं आवश्यक हे बरोबर पण स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट फ्रीजमधे चांगली राहील असं नाही. काही गोष्टी  फ्रीजबाहेरच चांगल्या राहातात, सामान्य तापमानात भरपूर दिवस टिकतात आणि त्या खराब होतात त्या केवळ फ्रीजमधे ठेवून, फ्रीजमधल्या अति थंड तापमानामुळे.

Image: Google

फ्रीजमधे काय ठेवू नये?

1. काॅफी 

काॅफी पावडर व्यवस्थित राहाण्यासाठी फ्रीजच्या अति थंड तापमानाची नाही तर कोरड्या आणि थोड्या थंड जागेची गरज असते. काॅफी ही एका हवाबंद डब्यात नीट काढून ठेवली आणि हा डबा कोरड्या आणि जिथे जास्त उष्णता असणार नाही अशा जागी ठेवल्यास् चांगली राहाते. 'नॅशनल काॅफी असोसिएशन' च्या संदर्भानुसार काॅफीच्या बिया घरातील सामान्य तापमानात सुरक्षित आणि चांगल्या राहतात. अति थंड, गरम आणि आर्द्र वातावरणात काॅफी पावडर ठेवल्यास ती खराब होते.

Image: Google

2.  पोळ्या आणि ब्रेड

काही गोष्टी थंड तापमानात ठेवल्यास त्यातील ओलावा निघून जातो आणि त्या कोरड्या होतात. पोळ्या आणि ब्रेडच्याबाबतीत ही बाब लागू पडते. पोळ्या आणि ब्रेडमध्ये जो ओलावा असतो, आर्द्रता असते ती फ्रीजमधे टिकून रहात नाही. पोळ्या आणि ब्रेड फ्रीजमधे ठेवल्यास ते कडक होतात. जास्तच शिळे लागतात.

Image: Google

3. टमाटे

टमाटे बाहेर ठेवल्यास त्याचा स्वाद, पोत आणि रंग छान रहातो. फ्रीजमधे टमाटे ठेवल्यास ते बाहेरुन चांगले दिसतात पण आतून खराब झालेले, चवीने नासलेले लक्षात येतात.  तसेच बाहेर ठेवलेले आणि फ्रीजमध्ये ठेवलेले टमाटे यांच्यात गुणात्मकरित्या झालेला बदल लगेच लक्षात येतो. फ्रीजमध्ये टमाटे ठेवल्यास त्यावर काळे डाग पडतात.  ते बेचव लागतात. फ्रीजमधे ठेवलेला टमाटा चिरायला घेतल्यास फ्रीजमधील अति थंडं वातावरणाचा त्यावर परिणाम झालेला जाणवतो . ते सहज चिरले जात नाही. फ्रीजच्या बाहेर ठेवलेला टमाट्याची साल ही पातळ राहाते, निबर होत नाही. असा टमाटा चिरताना टमाट्याच्या सालीतला करकरीतपणा जाणवतो. 

Image: Google

4. वांगे

वांगं भाजीचं असो की भरताचं ते तापमानाच्या दृष्टीने फारच संवेदनशील असतं. वांगे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास ते चांगले रहातात. पण फ्रीजमधे ते जर जास्त काळ ठेवले तर वांग्याचं  साल सुरकुतलेलं दिसतं.

Image: Google

5. कांदा

कांदा फ्रीजमधे ठेवल्यास तो नरम होतो. त्यातल्या कडकपणा निघून जातो. फ्रीजमधे कांदे साठवल्यास ते लवकर खराब होतात. चवीवरही परिणाम होतो. कांदा जर जास्त दिवस टिकवून ठेवायचा असेल तर तो फ्रीजच्या बाहेरच ठेवावा. 

Image: Google

6. लसूण

निवडलेला लसूण हवाबंद डब्यात फ्रीजमधे ठेवला तर तो काही काळ चांगला राहातो. पण निवडलेला लसूणही दीर्घकाळ फ्रीजमधे ठेवला तर तो चिकट होतो. त्याला कोंब फुटतात. वास सुटतो. असा लसूण स्वयंपाकात वापरता येत नाही. निवडलेला लसूण थोडाच काळ फ्रीजमधे चांगला राहातो. पण न निवडलेला लसूण फ्रीजमधे ठेवल्यास तो रबरासारखा होतो. तो नीट सोलला जात नाही.

Image: Google

7. मध

मध फ्रीजमधे ठेवल्यास त्याचा पोत बिघडतो. मधात गुठळ्या होतात. फ्रीजमधे मध ठेवल्यास ते घट्ट होतं. सामान्य तापमानात मध कितीही काळ नीट हवाबंद डब्यात/ बाटलीत चांगलं राहातं. सामान्य तापमानात स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची क्षमता मधात असते; मधाला फ्रीजच्या अति थंड तापमानाची गरज नसते. 

Image: Google

8. पीनट बटर

पीनट बटरच्या चव आणि त्यातील आरोग्यदायी गुणधर्मांमुळे आहारात त्याचं प्रमाण वाढलं आहे. पीनट बटर नेहमीच्या बटरप्रमाणे फ्रीजमधे ठेवल्यास बटरची चव आणि पोत बिघडते. ते घट्ट आणि कडक होतात. पोळीवर, ब्रेडवर ते सहज पसरवून लावता येत नाही. पसरवून लावण्याकामी येणारं पीनट बटर फ्रीजच्या बाहेर सामान्य तापमानात ठेवावं. 

Image: Google

9. टमाटा साॅस आणि केचप

टमाट्याच्या साॅसची बाटली उघडल्यानंतर फ्रीजमधे ठेवल्यास साॅसची मूळ चव बदलते. टमाट्याच्या साॅस आणि केचपमध्ये प्रीझर्व्हेटिव्हज असतात, त्यामुळे ते फ्रीजबाहेरच्या सामान्य तापामानातही ते टिकून राहातं. टमाट्याच्या साॅस आणि केचपची चव सांभाळायची असल्यास ते फ्रीजमधे ठेवू नये. 

Image: Google

10. ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह तेल हे फ्रीजमधे ठेवल्यास ते घट्ट होवून त्याचा पोत बटरसारखा होतो. 'जर्नल ऑफ फूड सायन्स'ने केलेला अभ्यास सांगतो की, ऑलिव्ह तेल फ्रीजमधे ठेवल्यास त्याचा पोत तर बिघडतोच शिवाय त्यातील ॲण्टिऑक्सिडण्टसची हानी होते. 

Image: Google

11. संत्री-पपई

चवीला आंबट असणारी संत्री मोसंबी सारखी फळं फ्रीजमधे ठेवू नये. फ्रीजमधील तापमानामुळे या फळांच्या चवीची आणि पोताची हानी होते. संत्री जर फ्रीजमधे ठेवल्यास तिच्यातला ताजेपणा निघून जातो. ती खूपच जुनी आणि सुकल्यासारखी दिसते. तसेच संत्र्याची चवही निघून जाते. फ्रीजमधे ठेवलेल्या संत्री मोसंबी बेचव लागतात. संत्री मोसंबीची  सालं ही जाड असतात. त्यामुळे संत्री-मोसंबी  बाहेर टिकून राहाण्यास अडचण येत नाही.

Image: Google

 पपई ही फ्रीजमधे न ठेवता ती बाहेर कागदात ठेवावी. आणि रोज ती कागदातून काढून पहावी. फ्रीजमधे पपई ठेवल्यास ती पिकलेली नसल्यास फ्रीजमधील थंड वातावरणामुळे पिकत नाही, त्यामुळे अशा पपईची चव लागत नाही. फ्रीजमधे पिकलेली पपई ठेवल्यास तिच्यातला गोडवा कमी होवून ती बेचव लागते. 

Web Title: 11 Things get worse when stored in the fridge; What not to keep in the fridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.