Lokmat Sakhi >Food > डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

1unique ways to protect pulses dals from insects : How do you store dals for a long time : best tip to keep your pulses, rice, and grains safe from insects : How to remove insects from dal : वर्षभर लागणारी डाळ खराब होऊ नये म्हणून स्टोअर करण्यापूर्वी करा एक काम... सोपी घरगुती ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 06:36 PM2024-11-13T18:36:40+5:302024-11-13T18:37:29+5:30

1unique ways to protect pulses dals from insects : How do you store dals for a long time : best tip to keep your pulses, rice, and grains safe from insects : How to remove insects from dal : वर्षभर लागणारी डाळ खराब होऊ नये म्हणून स्टोअर करण्यापूर्वी करा एक काम... सोपी घरगुती ट्रिक...

1unique ways to protect pulses dals from insects How do you store dals for a long time best tip to keep your pulses, rice, and grains safe from insects How to remove insects from dal | डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

कित्येकजणांच्या घरात वर्षभराच सामान एकदाच भरून ठेवलं जात. घरांत गहू, डाळी, इतर अन्नधान्य अनेकजण स्टोअर करून ठेवतात. परंतु अनेकदा अशा स्टोअर करुन ठेवलेल्या डाळी किंवा धान्याला किडे लागल्यामुळे अन्नधान्य खराब होण्याची भिती असते. काहीवेळा डाळी एकदम स्टोअर करून ठेवल्याने त्यात किडे होतात. या पोरकिड्यांमुळे डाळींचे नुकसान होते. हे किडे धान्य व डाळींचे दाणे पोखरून ठेवतात. याचबरोबर या धान्यांचा वापर आपण आहारातही करू शकत नाही. ज्यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त असते(How to remove insects from dal).

अशाप्रकारे एकदम एकाचवेळी स्टोअर करुन ठेवलेल्या डाळींत किडे- अळ्या झाल्याने त्या खाव्याशा वाटत नाही. याचबरोबर किड लागल्याने अशा डाळी  स्वच्छ करणंही कठीण जात. किड साफ करणे थोडे मेहनतीचे काम असते. अशी किड लागलेली डाळ वेळीच स्वच्छ केली नाही तर हळुहळु ती खराब होते. यासाठीच डाळींना किड(best tip to keep your pulses, rice, and grains safe from insects) लागू नये म्हणून आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सयुक्त पावडर लावून त्या स्टोअर करतो. परंतु या पावडरमधील केमिकल्स आपल्या आरोग्यासाठी अपायकारक असतात. जर साठवून ( How do you store dals for a long time) ठेवलेल्या डाळींना किड लागली तर ती सहज साफ करण्यासाठी एका सोप्या घरगुती नैसर्गिक टिप्सचा वापर करु शकतो. या ट्रिकमुळे डाळींना किड लागणार नाही शिवाय त्या खराब न होता वर्षभर आरामात टिकतील(1unique ways to protect pulses dals from insects).

डाळी खराब न होता टिकतील दीर्घकाळ...

डाळी खराब न होता वर्षभर चांगल्या टिकून राहण्यासाठी तसेच त्यात अळ्या, किड होऊ नये म्हणून मोहरीच्या तेलाचा वापर करावा. डाळींना स्टोअर करण्यापूर्वी त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवणे हा एक पारंपरिक उपाय आहे. डाळी वर्षभर स्टोअर करुन ठेवण्यापूर्वी एका मोठ्या बाऊलमध्ये डाळ घेऊन त्यात फक्त चमचाभर मोहरीचे तेल घालावे. मोहरीचे तेल घातल्यानंतर हातांच्या मदतीने ते सगळ्या डाळीत व्यवस्थित पसरवून घ्यावे. मोहरीचे तेल हलक्या हाताने डाळींना चोळून घ्यावे. यामुळे डाळी किंवा कडधान्ये अजिबात खराब न होता दीर्घकाळासाठी चांगल्या टिकून राहतात. १ किलो डाळीसाठी एक चमचा तेल याप्रमाणे मोहरीचे तेल घेऊन डाळींना चोळून घ्यावे. डाळींना मोहरीचे तेल लावण्याआधी डाळ निवडून घ्यावी तसेच डाळ ओली नसावी. डाळींना तेल लावल्यानंतर डाळ एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावी. 

शिळ्या चपातीची चमचमीत भेळ, फक्त १० मिनिटांत करा चायनीज भेळेसारखीच चटपटीत चपाती भेळ...

गरम मसाला घरीच करण्याची अचूक रेसिपी, मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात १ खास युक्ती...

डाळींना मोहरीचे तेल लावण्याचे फायदे... 

१. मोहरीच्या तेलातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म डाळींचा खराब होण्यापासून बचाव करते. यामुळे डाळी खराब न होता दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवण्यास मदत होते. 

२. मोहरीच्या तेलाचा तीव्र वासामुळे डाळींपासून किटक, अळ्या, किड लांबच राहतात. मोहरीचे तेल हे नैसर्गिक किटकनाशक म्हणून काम करते. मोहरीच्या तेलामुळे डाळींना किड, अळ्या लागण्यापासून संरक्षण केले जाते. 

३. डाळींमध्ये असलेली आर्द्रता किंवा ओलावा यामुळे किडे, अळ्या डाळींकडे आकर्षित होतात. तसेच डाळींमध्ये असलेली आर्द्रता किटकांच्या वाढीसाठी पोषक असते परंतु या डाळींना मोहरीचे तेल लावल्याने डाळींवर तेलाचे एक प्रकारचे आवरण तयार होते. यामुळे डाळीतील ओलावा शोषून घेतला जातो परिणामी, डाळींमध्ये अळ्या, किडे होत नाहीत. 

बिर्याणीसाठी बासमती तांदूळ आणला पण शिजून गचकाच होतो? करा ४ गोष्टी-एकेक सुगंधी दाणा वेगळा...


इतरही उपाय लक्षात ठेवा... 

१. डाळींमध्ये कच्च्या हळदीचा तुकडा घालावा. 
२. सुकलेल्या कडुलिंबाची पाने डाळीत पसरवून घाला.  
३. डाळीत खडे मीठ घालावे. 
४. डाळींच्या डब्यांत अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे गोळे करुन घालावेत.

Web Title: 1unique ways to protect pulses dals from insects How do you store dals for a long time best tip to keep your pulses, rice, and grains safe from insects How to remove insects from dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.