Lokmat Sakhi >Food > नेहमी फोडणीचाच भात कशाला? उरलेल्या भातापासून करा २ चटपटीत रेसिपी- सगळ्यांनाच खूप आवडतील

नेहमी फोडणीचाच भात कशाला? उरलेल्या भातापासून करा २ चटपटीत रेसिपी- सगळ्यांनाच खूप आवडतील

2 Amazing Recipe From Leftover Rice: भात उरलाच तर त्याला नेहमीप्रमाणे साधीच फोडणी घालण्यापेक्षा या दोन रेसिपी ट्राय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 09:19 AM2024-11-07T09:19:49+5:302024-11-07T09:20:02+5:30

2 Amazing Recipe From Leftover Rice: भात उरलाच तर त्याला नेहमीप्रमाणे साधीच फोडणी घालण्यापेक्षा या दोन रेसिपी ट्राय करून पाहा..

2 amazing recipe from leftover rice, how to make south Indian style tomato rice, veg pulao recipe | नेहमी फोडणीचाच भात कशाला? उरलेल्या भातापासून करा २ चटपटीत रेसिपी- सगळ्यांनाच खूप आवडतील

नेहमी फोडणीचाच भात कशाला? उरलेल्या भातापासून करा २ चटपटीत रेसिपी- सगळ्यांनाच खूप आवडतील

Highlightsनेहमीच्या पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या भाताची चव घ्यायची असेल तर पुढे सांगितलेल्या काही रेसिपी ट्राय करून पाहा.

नेहमी ताजं अन्न खावं हे अगदी खरं. अनेकजणी त्याप्रमाणेच स्वयंपाकाचं नियोजनही करतात. पण नेमकं थोडं कमी- जास्त होतं आणि मग एखादा पदार्थ उरतो. नेहमी उरणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे भात. भात उरला तर आपण त्याला फोडणी घालतो. मोहरी,  हळद, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, कडिपत्ता अशी फोडणी घालून केलेला भात खूप चवदार तर लागतोच. पण कधी कधी त्याच त्या चवीचा भात खाण्याचा कंटाळाही येतो. म्हणूनच आता या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या भाताची चव घ्यायची असेल तर पुढे सांगितलेल्या काही रेसिपी ट्राय करून पाहा.(2 Amazing Recipe From Leftover Rice) 

उरलेल्या भातापासून करा भाताचे २ चटपटीत प्रकार

 

१. टोमॅटो राईस

हा दक्षिणेतला एक प्रसिद्ध पदार्थ आहे. टोमॅटो राईस करण्यासाठी टोमॅटोची प्युरी करून घ्या. कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये जिरे, हळद, हिंग टाकून फोडणी करून घ्या. कांदा, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाका आणि ती चांगली उकळून घ्या.

दिवाळीच्या आधी फेशियल केलं; पण आता चेहरा पुन्हा रापलेला दिसू लागला? बघा उपाय- त्वचा चमकेल

त्यामध्येच थोडा सांबार मसाला टाका. यानंतर त्यामध्ये उरलेला भात आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्या. एखादा मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर कोथिंबीर टाकून गरमागरम टोमॅटो राईस खाऊन पाहा.

 

२. व्हेज पुलाव

पावभाजीच्या गाडीवर मिळतो तसा खमंग व्हेज पुलाव उरलेल्या भातापासून तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये आलं- लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, फ्लॉवर, बटाटे, गाजर असं सगळं घाला.

दिवाळीचा थकवा गेलाच नाही- फराळ खाऊन वजनही वाढलं? ५ टिप्स- शरीर डिटॉक्स होऊन वजन उतरेल

त्यात थोडा पावभाजी मसाला टाकून थोडंसं दही टाका. कढईवर झाकण ठेवून सगळ्या भाज्या दह्यामध्ये वाफवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये उरलेला भात आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की खमंग व्हेज पुलाव झाला तयार. 
 

Web Title: 2 amazing recipe from leftover rice, how to make south Indian style tomato rice, veg pulao recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.