बटाट्याचा वापर आपण विविध पदार्थ तयार करण्यासाठी करतो. पदार्थात बटाटा घालताच पदार्थाची चव वाढते. बटाट्याची भाजी, भजी, पराठे यासह अनेक पदार्थ केले जातात (Cooking Tips). घरात जर भाजी नसेल तर, आपण बटाटा शिजवून त्याला फोडणी देऊन भाजी तयार करतो. पण बऱ्याचदा बटाटे लवकर शिजून तयार होत नाही.
बटाटे शिजण्यासाठी साधारणपणे १० ते १५ मिनिटे लागतात. यात पाणी, वेळ, यासह गॅस देखील वाया जातो. पण जर आपल्याला गॅस आणि पाण्याशिवाय बटाटे शिजवायचे असतील तर, एक ट्रिक आपल्याला मदत करेल. या ट्रिकच्या मदतीने काही मिनिटांत बटाटे शिजतील(2 easiest ways to boil potatoes).
अरे देवा, भातात मीठ घालायलाच विसरले! ही घ्या १ युक्ती, एका मिनिटांत अळणी भाताला येईल चव
बटाटे लवकर शिजण्यासाठी टिप्स
गॅस आणि पाण्याचा वापर न करता बटाटे शिवण्यासाठी आपण मायक्रोवेव्हचा वापर करून पाहू शकता. यासाठी सुरीच्या मदतीने बटाट्यावर लांब चिरा पाडा. नंतर बटाटे स्वच्छ धुवून घ्या. एका बाऊलमध्ये बटाटे घ्या, त्यावर २ चमचे पाणी घाला, ५ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. ५ मिनिटानंतर बाऊल बाहेर काढून ठेवा. थंड झाल्यानंतर बटाटे बाऊलमधून बाहेर काढा. अशा प्रकारे बटाटे ५ मिनिटात परफेक्ट शिजतील.
कुकरचा वापर
१ कप रवा - १ कप गव्हाचे पीठ - करा झ्टपट कुरकुरीत डोसा, पोटभरीचा मस्त नाश्ता
बटाटे शिजवण्यासाठी आपण कुकरचा देखील वापर करू शकता. यासाठी बटाट्याचे २ तुकडे करा, आणि पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्या. बटाटे कुकरमध्ये फुटू नये असे वाटत असेल तर, अर्धा चमचा कुकरमध्ये मीठ घाला. असे केल्यामुळे कुकरच्या एका शिट्टीमध्ये बटाटे शिजतील. शिवाय शिजताना फुटणारही नाही.