लहानपणापासून आपल्याला केळी खाण्याची सवय लावण्यात आलेली आहे. केळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि व्हिटॅमिन बी ६ आढळते. परंतु, बाजारातून केळी आणल्यानंतर ते लगेच खराब होतात. अशा वेळी आपण केळी खाण्याऐवजी फेकून देतो.
बाजारातून केळी विकत आणल्यानंतर, ती जास्तीत जास्त २ ते ४ दिवस टिकते. अशा वेळी केळी जास्त काळ कशी टिकून राहतील, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. केळी जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? केळी सडण्यापासून वाचवण्यासाठी कोणती ट्रिक मदत करेल पाहूयात(2 easy hacks to keep bananas from ripening too fast).
१० दिवस केळी राहतील फ्रेश
केळी फ्रेश ठेवण्यासाठी काही लोकं बाजारातून कच्ची केळी विकत आणतात. व ती पिकल्यानंतर खातात. केळी अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी सीई सेफ्टीचे डायरेक्टर गॅरी एलिस यांनी सुपर हॅक शेअर केला आहे. ज्यामुळे केळी आरामात १० दिवस फ्रेश राहतील. या उपायामुळे केळ्यांवर काळे डाग देखील पडणार नाही.
१ वाटी चणाडाळीची करा साऊथ इंडियन पद्धतीची चटणी, डोसे - आप्पेसाठी स्पेशल चटणी
एक्स्प्रेस. को. युकेसह बोलताना गॅरी एलिस सांगतात, 'केळी इतर फळांपासून पूर्णपणे वेगळी ठेवावीत. यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूचे उत्पादन कमी होईल, व केळी लवकर काळपट पडणार नाही. केळी इतर फळांसह ठेवल्यास ते लवकर काळे तर पडतात, यासह खराब देखील होतात.
साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी
केळी फ्रिजमध्ये ठेवावे की नाही
अनेक जण म्हणतात केळी फ्रिजमध्ये साठवून ठेऊ नये. परंतु, एलिस यांच्या मते, आपण फ्रिजमध्ये केळी स्टोर करून ठेऊ शकता. केळी जर कच्ची असतील तर लवकर पिकणार नाही. जर केळी पिकलेली असतील तर, लवकर खराब होणार नाही. याशिवाय आणखी एक ट्रिक आहे, ती म्हणजे केळी स्वच्छ धुवून घ्या, नंतर त्याच्या देठावर प्लास्टिक किंवा सेलो टेप गुंडाळा. यामुळे केळी अधिक काळ फ्रेश राहतील.