Lokmat Sakhi >Food > पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

2 easy method to prevent the first chapati from getting wet : पोळ्यांची वाफ निघाली नाही तर पोळ्या ओल्या -शिडशिड्या होतात, ते टाळायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 10:22 AM2023-09-08T10:22:34+5:302023-09-08T11:25:38+5:30

2 easy method to prevent the first chapati from getting wet : पोळ्यांची वाफ निघाली नाही तर पोळ्या ओल्या -शिडशिड्या होतात, ते टाळायचं तर..

2 easy method to prevent the first chapati from getting wet. | पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...

रोजच्या जेवणात आपण पोळी, भाकरी यांसारख्या पदार्थांचा समावेश करतो. आपल्यापैकी काहीजणांना सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणासाठी पोळीच लागते. अशावेळी घरातील गृहिणी सकाळीच घरातील सगळ्यांना पुरतील इतक्या पोळ्या एकाचवेळी करते. काही महिला या वर्किंग वुमन असल्याकारणाने सकाळचे व रात्रीचे असे दोन्ही वेळचे जेवण एकदाच बनवून ठेवतात. अशावेळी आपण जेव्हा पोळी, पराठे, थालीपीठ, भाकरी बनवून एका  डब्यात काढून ठेवतो. जेव्हा आपण पहिली पोळी किंवा भाकरी भाजून गरम गरम तव्यावरून उतरवून डब्ब्यात ठेवतो. डब्यातील ती पहिली चपाती गरम वाफेमुळे काही वेळाने ओली होते. या पहिल्या पोळीला नेहमी पाणी सुटते. पाणी सुटल्याकारणाने पोळी, भाकरी, पराठा काहीही असो वाफेने संपूर्ण भिजून जाते. अशी वाफ धरून ओली झालेली पोळी किंवा भाकरी घरातील कोणतीही व्यक्ती खाण्यास तयार होत नाही. तसेच रोज अशी एक पोळी वाया गेल्याने अन्नाचे देखील फार नुकसान होते.

नेहमी पहिली पोळी बनवून झाल्यावर ती आपण एका डब्यांत काढून ठेवतो. ही पोळी एकदम डब्याच्या तळाशी ठेवली जाते. अशावेळी डब्याच्या तळाशी ही पोळी ठेवल्याने वाफेने ती सादळून थोड्यावेळाने ओली होते. अशी ओली झालेली पोळी खायला नको वाटते.अशा परिस्थिती काहीवेळा ही पोळी फेकून दिली जाते, यामुळे अन्नाचे फार नुकसानं होते. डब्यातील ही पहिली पोळी किंवा भाकरी ओली होऊ नये म्हणून सोपा उपाय आपल्याला करता येऊ शकतो(2 easy method to prevent the first chapati from getting wet).

पहिली पोळी वाफेने ओली होऊ नये म्हणून नक्की काय करता येऊ शकते...  

१. सर्वप्रथम आपण ज्या डब्यांत पोळ्या काढून ठेवतो त्या डब्याच्या तळाशी आपण एक छोटे स्टॅन्ड किंवा छोटी डिश ठेवू शकतो. गरम भांडे ठेवण्यासाठी आपण ज्या गोल स्टीलच्या स्टॅण्डचा वापर करतो त्याचा वापर करावा. पोळ्या ठेवण्याच्या कॅसरोलच्या डब्याच्या तळाशी हे स्टीलचे स्टॅन्ड ठेवून द्यावे. त्यावर गरम पोळ्या ठेवल्या तरीही त्यातून गरम वाफ बाहेर निघून जाऊन शेवटची पोळी वाफेने भिजत नाही. 

कणिक मळण्यात फार वेळ जातो? १ झटपट सोपी ट्रिक, २ मिनिटांत कणिक भिजवून होईल...

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

इडली करताना झाकणातल्या वाफेचं पाणी पडून ती ओली होते? १ सोपा उपाय... इडली बनेल परफेक्ट..

२. आपण जर पोळी ठेवण्याच्या डब्ब्यात तळाला टिश्यू पेपर अंथरून घालत असू तर अशावेळी या ओलाव्यामुळे हा टिश्यू पेपर त्या पोळीला किंवा भाकरीला चिटकून राहण्याची शक्यता असते. ही डब्यातील पहिली पोळी वाया जाऊ नये म्हणून तव्यावरून उतरवून ती एका उंच जाळीवर गरम वाफ जाईपर्यंत ठेवावी. जेणेकरून या पोळीतील गरम वाफ या जाळीमधून बाहेर पडेल. यामुळे तुमची डब्यातील पहिली पोळी किंवा भाकरी, पराठा भिजून वाया जाणार नाही. फुलका ग्रील किंवा जाळी तुम्हाला बाजारांत सहज विकत मिळू शकते. जर तुमच्याकडे जाळी नसल्यास तुम्ही मोठी जाळीदार गाळण किंवा लहान छिद्र असलेल्या चाळणीचा वापर करू शकता. अशाप्रकारे तुमच्या डब्यातील पहिली पोळी, भाकरी, थालीपीठ वाफेमुळे भिजून न जाता खाण्यायोग्य राहील.

मिक्सरमध्ये २ मिनिटांत कणिक भिजवण्याची सोपी ट्रिक, बघा झटपट सोपा पर्याय...

Web Title: 2 easy method to prevent the first chapati from getting wet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.