Lokmat Sakhi >Food > सिताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्याच्या २ सोप्या पद्धती,आईस्क्रीम, रबडी करणं होईल सोपं...

सिताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्याच्या २ सोप्या पद्धती,आईस्क्रीम, रबडी करणं होईल सोपं...

2 Easy Tricks to remove Sitafal Custard apple pulp from seeds : सिताफळाचे आईस्क्रीम, रबडी करायची असेल तरी सिताफळाचा गर कसा काढायचा याविषयी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 09:13 AM2023-11-22T09:13:53+5:302023-11-22T09:15:02+5:30

2 Easy Tricks to remove Sitafal Custard apple pulp from seeds : सिताफळाचे आईस्क्रीम, रबडी करायची असेल तरी सिताफळाचा गर कसा काढायचा याविषयी..

2 Easy Tricks to remove Sitafal Custard apple pulp from seeds : 2 simple methods to separate the pulp and seeds of sitafal, making ice cream, rabdi will be easy... | सिताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्याच्या २ सोप्या पद्धती,आईस्क्रीम, रबडी करणं होईल सोपं...

सिताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्याच्या २ सोप्या पद्धती,आईस्क्रीम, रबडी करणं होईल सोपं...

थंडीचे दिवस म्हणजे सिताफळाचा सिझन. वर्षभर न मिळणारे हे फळ थंडीच्या दिवसांत अगदी सहज बाजारात दिसते. एरवी महाग मिळणारे हे फळ थंडीत बरेच स्वस्त होते. सिताफळ अनेकांच्या आवडीचे फळ असल्याने ते आवर्जून आणले जाते. कॅल्शियम आणि भरपूर व्हिटॅमिन्सचा खजिना असलेले हे फळ आवर्जून खायला हवे असे सांगितले जाते. सिताफळात लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर ठरते (2 Easy Tricks to remove Sitafal Custard apple pulp from seeds).

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करत असल्याने हृदयविकार असलेल्यांनी सिताफळ खायला हवे. पण सिताफळ बिया काढून त्याचा गर खावा लागत असल्याने लहान मुलं आणि ज्येष्ठ मंडळीना हे फळ खाता येत नाही. तसेच सिताफळाचे आईस्क्रीम, रबडी करायची असेल तरी सिताफळाचा गर कसा काढायचा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. त्यासाठीच आज आपण सिताफळाचा गर काढण्याच्या २ सोप्या पद्धती पाहणार आहोत. या पद्धतींमुळे गर आणि बिया अगदी सहज वेगळ्या होतात.

१. एक बाऊल घेऊन त्यावर चहा गाळायची गाळणी ठेवायची. चमच्याने गर आणि बिया या गाळणीत घालायचे. व्हीस्करच्या साह्याने या बिया आणि गर चांगले फेटायचे २ ते ३ मिनीटे चांगले दाबल्यानंतर  या बिया गरापासून वेगळ्या होतात. मग आपण चमच्याने या बिया गरातून वेगळ्या काढू शकतो. मग हा गर खालच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा. 


२. कांदा कापण्याचा चॉपर असतो त्यामध्ये सिताफळाचा गर आणि बिया घालायच्या आणि चॉपरची दोरी नेहमीप्रमाणे ओढायची. या चॉपरमध्ये असणाऱ्या ब्लेडमुळे बिया आणि गर वेगळे होण्यास मदत होते. गर भांड्याला चिकटलेला असल्याने यातून आपण चमच्याने बिया वेगळ्या काढू शकतो. 


 

Web Title: 2 Easy Tricks to remove Sitafal Custard apple pulp from seeds : 2 simple methods to separate the pulp and seeds of sitafal, making ice cream, rabdi will be easy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.