Join us  

पाकातले रवा लाडू करायची ही घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी, लाडू ना बिघडतील ना कडक होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 6:38 PM

2 in 1 besan sooji laddu recipe | rava besan ke ladoo पाकातले रवा लाडू करायची अनेकदा भीती वाटते, मात्र न चुकता करा परफेक्ट लाडू

लाडू म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लाडूचे अनेक प्रकार केले जातात. त्यात बेसन रव्याचे लाडू फार फेमस आहे. जेवण केल्यानंतर किंवा अचानक अनेकांना गोड खाण्याची क्रेविंग्स होते. अशा वेळी बाहेरील कृत्रिम साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच पाकातले बेसन रव्याचे लाडू करून खा.

बेसन आणि रवा हे घरी असतेच, कमी साहित्यात - झटपट जर आपल्याला गोड पदार्थ करायचं असेल तर हे लाडू नक्की करून पाहा. काही लोकांचे लाडू करताना फसतात, बिघडतात. परंतु, योग्य प्रमाणात साहित्य घेतल्यास हे लाडू फसणार नाही. शिरा, खीर, गोड शेवया खाण्यापेक्षा बेसन रव्याचा लाडू करा. पौष्टीक आणि हेल्दी लाडू तोंडात घालताच विरघळतील(2 in 1 besan sooji laddu recipe | rava besan ke ladoo).

पाकातले बेसन रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

रवा

तूप

साखर

पावसाळ्यात सुकं खोबरं काळं पडतं, खवट होतं? ४ टिप्स- खोबरं टिकेल मस्त

सुका मेवा

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात दोन चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात २ कप रवा व २ कप बेसन घालून भाजून घ्या. रवा आणि बेसन भाजून घेत असताना पुन्हा त्यात २ चमचे तूप घाला, व चमच्याने ढवळत राहा. शेवटी हाताने थोडे पाणी शिंपडून मिक्स करा.

कुरडईची भाजी नूडल्सहून भारी, करुन पाहा पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट कांदा-कुरडई!

आता पाक करण्यासाठी अडीच कप साखर घ्या, त्यात एक कप पाणी घालून एक तारी पाक तयार करून घ्या. व हे तयार पाक बेसन - रव्याच्या मिश्रणात घाला. शेवटी सुका मेवा, एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करा. गॅस बंद करा, व मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता लाडू वळा. अशा प्रकारे पाकातले बेसन - रव्याचे लाडू खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स