Lokmat Sakhi >Food > कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

2 Ingredient Peanut Jaggery Ladoo : गुळ शेंगदाणे हे आपलं पारंपरिक अन्न, ते खाऊनही फिट होता येतंच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 01:33 PM2023-11-01T13:33:59+5:302023-11-01T13:34:46+5:30

2 Ingredient Peanut Jaggery Ladoo : गुळ शेंगदाणे हे आपलं पारंपरिक अन्न, ते खाऊनही फिट होता येतंच.

2 Ingredient Peanut Jaggery Ladoo, Winter Special Recipe | कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

कपभर गुळ-शेंगदाण्याचा करा पौष्टिक लाडू ५ मिनिटांत, हिवाळ्यात रोज सकाळी फक्त १ लाडू खाऊन तर पाहा

लाडू खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. तीळ, खोबरं, बुंदी, शेव, बेसन यासह विविध प्रकारचे लाडू चवीने खाल्ले जातात. लाडू तयार करणं हे खरंच कौशल्याचं काम आहे. जर आपल्याला हिवाळ्यात टेस्टी आणि हेल्दी लाडू खायचे असतील तर, गुळ शेंगदाण्याचे लाडू खा.

लहानपणी वडिलधाऱ्यांनी नक्कीच रोज मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाण्याचा सल्ला दिला असेल तर. जर आपल्याला फक्त गुळ आणि शेंगदाणे खायचे नसतील तर, त्याचे लाडू तयार करून खा. हे लाडू उपवासाला देखील खाल्ले जाऊ शकतात. शिवाय स्टोअर करून ठेवल्यास ते अधिक काळ टिकतात(2 Ingredient Peanut Jaggery Ladoo).

गुळात आढळणारे पौष्टीक घटक

गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने, ब जीवनसत्व इत्यादी पोषक घटक आढळतात. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. शिवाय आपण आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाचा समावेश करू शकता.

'मैने प्यार किया'तली सुमन आजही दिसते तरुण, पाहा तिचं सिक्रेट ग्रीन लंच- हिरव्यागार जेवणाची रंगत

शेंगदाण्यात आढळणारे पौष्टीक घटक

शेंगदाण्यात प्रथिनांसह, अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन बी ९ आणि पॅन्टोथेनिक ऍसिड सारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

गुळ-शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

गुळ

शेंगदाणे

कृती

सर्वप्रथम, अर्धा किलो गुळ किसून घ्या. किसून घेतलेलं गुळ एका प्लेटमध्ये ठेवा. दुसरीकडे एका कढईत अर्धा किलो शेंगदाणे घालून भाजून घ्या. शेंगदाणे आणि गुळ हे समप्रमाणात घ्यावे. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एका परातीत काढून घ्या. जेणेकरून शेंगदाणे थंड होतील. शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या. नंतर मिक्सरचं भांडं घ्या, त्यात शेंगदाणे आणि गुळ  घालून वाटून घ्या.

ना मैदा-ना सोडा, कपभर गव्हाच्या पिठाची आप्पे पात्रात करा खुसखुशीत नानकटाई, पौष्टीक रेसिपी-टिकेल महिनाभर

गुळ आणि शेंगदाण्याची भरड तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या, व हातावर भरड घेऊन लाडू वळवून घ्या. जर लाडवाचं मिश्रण कोरडं झालं असेल तर, मिश्रण वाटताना आपण त्यात खजूर घालू शकता. किंवा तूप आणि ड्रायफ्रुट्स देखील घालून मिक्स करू शकता. जेणेकरून लाडू अधिक पौष्टीक आणि चविष्ट होतील.

Web Title: 2 Ingredient Peanut Jaggery Ladoo, Winter Special Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.