उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या आधीच खूप कमी प्रमाणात विकायला येतात. त्यात अगदी फ्रेश, ताज्या भाज्यांचे प्रमाणही कमीच असते. कारण या दिवसांत भाज्या खूप लवकर सुकून जातात. त्यामुळेच पालेभाज्या या दिवसांत खूप महागलेल्या असतात. एरवी पालेभाज्यांची जी जुडी आपण ५- ७ रुपयांना घेताे तिचाच भाव उन्हाळ्यात १५ ते २० रुपयांपर्यंत पोहोचलेला असतो. त्यामुळे एवढी महागडी कोथिंबीर अगदी पुरवून पुरवून वापरावी असे वाटतं (2 simple tips to keep coriander green and fresh in summer). पण नेमकं २ दिवसांतच ती सुकून जाते. म्हणूनच एकदा आणलेली कोथिंबीरीची जुडी जास्त दिवस फ्रेश आणि हिरवीगार ठेवण्यासाठी या काही साध्या- सोप्या गोष्टी करून पाहा. (how to store dhaniya or coriander fresh for long)
उन्हाळ्यात कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी उपाय
१. बाजारातून कोथिंबीर आणली आणि ती तुमच्याकडून निवडणं झालं नाही तर सरळ एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात कोथिंबीरीची जुडी बुडवून ठेवा.
केसांना भरभरून पोषण देणारे ६ पदार्थ, रोजच खा- केसांचं गळणं होईल बंद, वाढतील भराभर...
कोथिंबीरीच्या काड्यांचा पाण्यात बुडतील एवढं पाणी ग्लासमध्ये असावं. तो ग्लास फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि तुम्हाला जशी लागेल तशी कोथिंबीर तोडून घ्या. यामुळे कोथिंबीर चांगली फ्रेश राहील.
२. कोथिंबीर घेतल्यानंतर ती व्यवस्थित निवडून घ्या. त्यानंतर एका वर्तमान पत्रावर पसरवून ठेवा. यामुळे तिच्यातला ओलावा निघून जाईल आणि ती पुर्णपणे वाळून जाईल.
पिवळे दात होतील पांढरेशुभ्र, दात किडणं, हिरड्या दुखणंही बंद- डेंटिस्ट सांगतात १ सोपा उपाय
कोथिंबीरीतला ओलावा निघून गेल्यानंतर ती एखाद्या वर्तमान पत्रावर टाका आणि त्याची अशाप्रकारे घडी करा की त्यातून हवा अजिबात आत जाणार नाही. त्यानंतर कागदाची पुडी एखाद्या एअरटाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. कोथिंबीर अधिककाळ फ्रेश आणि हिरवीगार राहील.