वांगी. कुणाला खूप आवडतात. कुणाला अजिबात नाही. वांग्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. वांग्याची भाजी, वांग्याची आमटी, वांग्याचे काप, वांग्याची भजी, वांग्याचं भरीत, हे सगळे पदार्थ आपण चवीने खातो. वांग्यामध्ये विटामिन बी६, थायमिन आणि विटामिन केचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे पचनसंस्थेचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
पण वांग्यात खूप बिया असल्या तर भाजी चांगली लागत नाही. कसं ओळखाल की वांगी कोवळी आहेत की खूप बियांनी भरलेली, निबर आहेत? वांगी चांगली निवडणं अनेकांना कठीण जाते. कारण बाहेरून टवटवीत दिसणारी वांगी आतून पोकळ किंवा खराब असू शकतात(2 Things to Look for When Buying Eggplant at the Grocery Store).
काही केल्या चपात्या गोल होत नाहीत? नकाशे वेडेवाकडे? कडकही होतात? सोप्या ३ टिप्स..शिका चपात्या करायला
वांग्यात बिया आहेत की नाही हे कसे ओळखाल
१- वांग्यात बिया आहेत की नाही, हे त्याच्या वजनावरून ओळखता येऊ शकते. जर वांगी वजनाने जास्त असतील तर, त्यात जास्त बिया आहेत. जर ते वजनाने हलके असेल तर, त्यात कमी बिया आहेत याचा अंदाज बांधून वांगी खरेदी करा.
करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल
२- वांग्याच्या आकारावरून देखील आपण वांग्यांमध्ये बिया आहेत की नाही हे ओळखू शकतो. जर वांगी पातळ आणि लांब असतील तर याचा अर्थ त्यात कमी बिया आहेत. जाड आणि रुंद वांग्यांमध्ये जास्त बिया असतात.