Join us

तळणीचे मोदक करताना तेलात फुटू नयेत म्हणून ३ टिप्स, मोदक होतील खमंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2023 12:33 IST

How to Make Fried Modak Perfectly?: तळताना मोदक कढईत टाकला की फुटतो.... असं होऊ नये म्हणून तळताना या २ गोष्टी लक्षात ठेवा.

ठळक मुद्देया घ्या २ टिप्स... कढईमध्ये टाकल्यावर मोदक फुटणार तर नाहीच उलट छान फुलून येतील.

गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे यंदा कशी सजावट करायची याची जशी तयारी सुरू आहे, तशीच तयारी गणेशोत्सवात नैवेद्यासाठी कोणकोणते पदार्थ करायचे, याचीही असतेच. गणेशोत्सवात (Ganpati Festival) हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे गणरायाचे आवडीचे मोदक. आता उकडीचे मोदक (Ukadiche modak recipe) करणं जरा जास्त अवघड आहे. त्या तुलनेत तळणीचे मोदक सोपे असले, तरी त्यासाठीही थोडे कौशल्य लागतेच. कारण तळणीचे मोदक करताना तेलात टाकले की ते फुटतातच, असा अनेकींचा अनुभव असतो. तुमचाही अनुभव असाच असेल तर या घ्या २ टिप्स (Tips and tricks for fried modak recipe)... कढईमध्ये टाकल्यावर मोदक फुटणार तर नाहीच उलट छान फुलून येतील. (How to make fried modak perfectly?)

 

मोदक तळताना तेलात फुटू नयेत म्हणून टिप्स१. पीठ घट्ट भिजवामोदकाच्या आवरणासाठी जे पीठ लागते, ते भिजवताना त्यात पाणी बेतानेच टाकावे आणि पीठ घट्ट भिजवावे. पीठ जर सैल असेल तर मोदकाची पुरी पातळ लाटली जाते आणि मग तळताना ते खालच्या बाजुने फुटतात.

 

२. सारण कसे भरायचेमोदकाच्या आवरणाला घेतलेले पीठ कमी आणि सारण जास्त असं उलट प्रमाण घेतलं तरी मोदक फुटतात. आता मोदक तोंडात टाकल्यावर तोंडभर त्याचा गोडवा लागायला हवा. त्यासाठी सारण कमी टाकून चालतच नाही.

ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

पण म्हणून त्यात खूप जास्त सारणही भरू नये. मोदकाच्या आवरणाला जे पीठ घ्याल त्याच्या पाऊण हिस्सा सारण घ्यावे. 

३. पातळ लाटू नकामोदकाच्या आवरणासाठी जी पुरी लाटता, ती खूप पातळ लाटू नये.

सतत अर्ध डोकं ठणकतं, मायग्रेनचा त्रास? ६ आयुर्वेदिक उपाय, डॉक्टर सांगतात..

तिचा मधला भाग तर मुळीच लाटून- लाटून पातळ करू नये. कारण तसे झाले तर मोदक तळताना हमखास फुटतोच.  

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणेश चतुर्थी रेसिपी