पावसाळी हवेमुळे सध्या चिवडा, शेव, चकली असे पदार्थ थोडेसे जरी उघडे राहिले तरी लगेच सादळून जातात. किंवा चिवट होतात. असे चिवट झालेले पदार्थ मुळीच खावे वाटत नाहीत. त्यामुळे मग बऱ्याच जणी ते पदार्थ टाकून देतात. त्यामुळे एवढा चवदार पदार्थ वाया गेला याचं वाईट तर वाटतंच, पण पैसे वाया गेले याचं दु:खही होतं. म्हणूनच यापुढे जर तुमच्या घरचे चिवडा, शेव सादळले असतील तर ते टाकून देऊ नका. कारण त्यापासून अतिशय चवदार पदार्थ करता येतात. (3 Amazing recipe from leftover chivda and shev)
सादळलेल्या चिवडा- शेव वापरून केलेले पदार्थ
१. पिठलं
ही रेसिपी करण्यासाठी चिवट झालेला चिवडा, शेव मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. त्यात पाणी टाकून कालवून घ्या. आता कढईमध्ये तेल टाकून लसूण, मिरची, घालून फोडणी करून घ्या.
रोज फक्त ५ मिनिटं कानाला मसाज करा, स्ट्रेस- छातीतली धडधड होईल कमी- पाहा भन्नाट युक्ती
त्यात कांदा परतून घ्या आणि मग पिठल्यासाठी जसं हरबरा डाळीचं पीठ टाकतो, तसं हे चिवडा- शेवचं पातळ मिश्रण टाका. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. मस्त गरमागरम पिठलं तयार... खाऊन पाहा एकदा.
२. थालीपीठ
थालीपीठ करण्यासाठीही शेव, चिवडा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात थोडी कणिक टाका. कोबी, कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर अशा तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यात किसून टाका.
चवीनुसार मीठ- तिखट घाला. पाणी आणि थोडंसं दही टाकून सगळं मिश्रण मळून घेतलं की त्याचे थालीपीठ लावा किंवा मग पराठे लाटा. गरमागरम पराठे किंवा थालीपीठ सगळ्यांना आवडतील.
३. ग्रेव्हीसाठी वापर
मसालेदार भाज्या करण्यासाठी आपण कांदा- टोमॅटो यांची ग्रेव्ही करतो. त्यात थोडं चिवडा- शेवचं मिक्सरमधून बारीक केलेलं मिश्रणही टाका.
चारचौघात बोलण्याची भीती वाटते- कॉन्फिडन्सच गेलाय? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, भीती जाईल पळून
भाजीत दाण्याचा कूट टाकण्याऐवजीही तुम्ही ते वापरू शकता. ग्रेव्हीचा थिकनेस वाढविण्यासाठी आणि भाजी आणखी चवदार करण्यासाठी चिवट झालेले शेव- चिवडा चांगले उपयोगात येतात.