Lokmat Sakhi >Food > गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचं काय करावं? बघा ३ पर्याय- गुलाबजाम एवढेच चवदार पदार्थ तयार

गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचं काय करावं? बघा ३ पर्याय- गुलाबजाम एवढेच चवदार पदार्थ तयार

What To Do With Leftover Syrup Of Gulabjamun: गुलाबजाम तर आपण फस्त करतो. पण त्याचा पाक मात्र उरतो. त्या पाकाचं आता काय करायचं ते पाहा...(4 best recipies from leftover gulabjamun syrup or chashni)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2024 04:01 PM2024-09-04T16:01:03+5:302024-09-04T16:01:47+5:30

What To Do With Leftover Syrup Of Gulabjamun: गुलाबजाम तर आपण फस्त करतो. पण त्याचा पाक मात्र उरतो. त्या पाकाचं आता काय करायचं ते पाहा...(4 best recipies from leftover gulabjamun syrup or chashni)

3 best recipies from leftover gulabjamun syrup or chashni, what to do with leftover syrup of gulabjamun | गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचं काय करावं? बघा ३ पर्याय- गुलाबजाम एवढेच चवदार पदार्थ तयार

गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचं काय करावं? बघा ३ पर्याय- गुलाबजाम एवढेच चवदार पदार्थ तयार

Highlightsमुलांना डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस चहासोबत काहीतरी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. 

गुलाबजाम हा बहुतांश लोकांचा एक अतिशय आवडीचा पदार्थ. आपण मोठ्या हौसेने गुलाबजाम करतो किंवा विकत आणतो. दोन्ही वेळेस बहुतांशवेळा हाच अनुभव येतो की गुलाबजाम तर संपून जातात. पण त्याचा पाक मात्र खूप उरतो. तो टाकूनही द्यावा वाटत नाही आणि खाऊनही टाकावा वाटत नाही. अशावेळी या भांड्यातून त्या भांड्यात लोळत पडणाऱ्या त्या पाकाचं काय करावं, हे समजत नाही (what to do with leftover syrup of gulabjamun?). त्यासाठीच आता हे काही पर्याय पाहा. गुलाबजामचा पाक कधीच वाया जाणार नाही... (4 best recipies from leftover gulabjamun syrup or chashni)

गुलाबजामच्या उरलेल्या पाकाचे काय करावे?

 

१. शंकरपाळी

गुलाबजामचा पाक उरला असेल तर त्यात थोडा मैदा आणि थोडं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घाला आणि ते घट्ट भिजवून घ्या.

गौरी-गणपतीसाठी वस्त्रमाळा करायच्या? बघा नव्या प्रकारचे सुंदर डिझाईन्स, पारंपरिकतेला नाविन्याची झालर

आता त्याचे बारीक शंकरपाळे करा आणि ते तेलात तळून घ्या. छान कुरकुरीत शंकरपाळी तयार होतील. बिस्किटांऐवजी मुलांना देण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे.

 

२. गोड पुऱ्या

गुलाबजामच्या पाकामध्ये कणिक टाका आणि चांगली मळून घ्या. गरज पडल्यास त्यात थोडं दूधही घालू शकता. आता त्याच्या जाडसर पुऱ्या लाटा आणि तेलात तळून घ्या.

कुंडीतल्या रोपांना द्या ५ प्रकारचे 'जादुई' पाणी; रोपं बहरून जातील- फुलंही भरपूर येतील

मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस चहासोबत काहीतरी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. 

 

३. शिरा

मुगाच्या डाळीचा शिरा, रव्याचा शिरा, कणकेचा शिरा असा कोणत्याही प्रकारचा शिरा तुम्ही गुलाबजामच्या उरलेल्या पाकापासून करू शकता. सगळी कृती नेहमीप्रमाणेच करायची फक्त साखर आणि पाण्याच्या ऐवजी गुलाबजामचा पाक घालायचा. एकदा ट्राय करून पाहा.

अंग नेहमीच दुखतं- पायांत गोळे येतात? डॉक्टर सांगतात ४ पदार्थ खा; दुखणं पळेल- ठणठणीत व्हाल 

४. लाडू 

गुलाबजामच्या उरलेल्या पाकामध्ये दाण्याचा कूट टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. त्याचे छान लाडू वळा. लाडू वळताना हाताला थोडं तूप लावून घ्या. चवदार लाडू झटपट तयार..

 

Web Title: 3 best recipies from leftover gulabjamun syrup or chashni, what to do with leftover syrup of gulabjamun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.