संध्याकाळच्या वेळी थोडीशी भूक लागली तर मुरमुरे तोंडात टाकायला बरे असतात. कधी कधी आपण त्या मुरमुऱ्यांमध्ये फरसाण, शेव टाकतो आणि त्याला थोडी चव आणण्याचा प्रयत्न करतो. मुरमुरे खायलाही अतिशय पौष्टिक असतात. शिवाय वेटलॉस करणाऱ्यांसाठीही मुरमुरे खाणं अतिशय फायदेशीर ठरतं. पण नुसते मुरमुरे खाण्यापेक्षा त्याला थोडा चवदार ट्विस्ट द्या (tasty murmure or churmure recipe without using gas). यामुळे मुरमुऱ्यांना चांगली चव येईल, शिवाय ते जास्त पौष्टिकही होईल (5 minutes recipe of murmura). मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे. (3 Easy and quick recipe using puffed rice)
मुरमुऱ्यांच्या ३ चवदार रेसिपी
रेसिपी १
ही रेसिपी करण्यासाठी एका भांड्यात मुरमुरे घ्या. साधारण दोन ते अडीच वाट्या मुरमुरे असतील तर त्यासाठी एक लहान आकाराचा टोमॅटो घ्या. २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर घ्या. मुरमुऱ्यांमध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घाला. थोडं मीठ, थोडं तिखट, थोडा चाट मसाला आणि थोडंसं तेल टाकून हलवून घ्या. हे टोमॅटो टाकलेले मुरमुरे अतिशय चवदार लागतात.
रेसिपी २
ही रेसिपी करण्यासाठी मेतकुट वापरा. त्यासाठी एका भांड्यात २ ते ३ वाट्या मुरमुरे घ्या. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि चिमूटभर तिखट टाका. २ टेबलस्पून दही घ्या.
त्वचेसाठी 'असा' करा संत्रीच्या सालींचा जादुई उपयोग, त्वचा नेहमीच राहील 'यंग आणि ब्यूटीफूल'
त्यामध्ये १ टेबलस्पून मेतकूट टाकून दही आणि मेतकूट व्यवस्थित कालवून घ्या. दही- मेतकूट मुरमुऱ्यांमध्ये टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. मेतकूट घातलेले मुरमुरे चवीला अतिशय छान लागतात.
रेसिपी ३
लोणच्याचा खार वापरूनही मुरमुऱ्यांना खूप छान चव आणता येते. यासाठी एका भांड्यात मुरमुरे घ्या.
केसांच्या 'या' ५ समस्या कमी करण्यासाठी जास्वंद वापरा
त्यामध्ये लोणच्याचा खार आणि थोडं तेल टाका. तेल नको असेल तर दही टाकलं तरी चालेल. या रेसिपीमध्ये मीठ घालू नका. कारण लोणच्याचा खार खारट असतो. चवीला थोडी कोथिंबीर टाका. यामध्ये सिमला मिरची, पत्ताकोबी अशा कच्च्या भाज्या घातल्या तरी चालतील.