Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात गारठ्याने घसा खवखवतो? चहा-कॉफीपेक्षा प्या ३ झक्कास सूप, घशाला आराम

पावसाळ्यात गारठ्याने घसा खवखवतो? चहा-कॉफीपेक्षा प्या ३ झक्कास सूप, घशाला आराम

3 Easy Soup Recipe for Throat Irritation In Monsoon Home Remedy for Cough and Cold : बाहेर पावसाचा गारठा असताना घशाला आराम मिळेल आणि आरोग्यालाही उपयोग होईल अशी पेय कोणती ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 04:41 PM2023-06-30T16:41:41+5:302023-08-02T10:23:19+5:30

3 Easy Soup Recipe for Throat Irritation In Monsoon Home Remedy for Cough and Cold : बाहेर पावसाचा गारठा असताना घशाला आराम मिळेल आणि आरोग्यालाही उपयोग होईल अशी पेय कोणती ते पाहूयात.

3 Easy Soup Recipe for Throat Irritation In Monsoon Home Remedy for Cough and Cold : Sore throat in rainy season? Take 3 soup instead of tea and coffee, your throat will get relief.... | पावसाळ्यात गारठ्याने घसा खवखवतो? चहा-कॉफीपेक्षा प्या ३ झक्कास सूप, घशाला आराम

पावसाळ्यात गारठ्याने घसा खवखवतो? चहा-कॉफीपेक्षा प्या ३ झक्कास सूप, घशाला आराम

जवळपास १ आठवडा झाला पावसाने राज्याच्या अनेक ठिकाणी झोडपून काढले आहे. संततधार असल्याने थंडीनेही अचानक जोर पकडला आहे. प्रचंड उकाडा असताना वातावरणात काही दिवसांत झालेला हा बदल आरोग्यासाठी मात्र काहीसा घातक आहे. पाऊस, हवेतील ओलावा आणि थंडावा यांमुळे विविध प्रकारच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सूर्याने गेले काही दिवस दर्शनच दिलेले नसल्याने एकप्रकारचा उबटपणा निर्माण झाला आहे. हवा बदलली की घसा धरणे, सर्दी-कफ होणे, खोकला येणे, ताप येणे इतकेच नाही तर त्वचेच्या समस्या, जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होतात (3 Easy Soup Recipe for Throat Irritation In Monsoon Home Remedy for Cough and Cold). 

आपले शरीर नव्याने येणाऱ्या ऋतूशी जुळवून घेत असल्याने या सगळ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते. अशावेळी लगेच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आधी घरच्या घरी काही सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. घसा खवखवायला लागला की आपण एकतर गरम पाणी पितो नाहीतर सतत चहा-कॉफी घेत राहतो. एखादवेळी चहा किंवा कॉफी घेणे ठिक असले तरी सतत ही पेय घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. बाहेर पावसाचा गारठा असताना घशाला आराम मिळेल आणि आरोग्यालाही उपयोग होईल अशी पेय कोणती ते पाहूयात. 

(Image : Google)
(Image : Google)

१. आयुर्वेदीक चहा किंवा काढा

१ ते १.५ कप पाणी घेऊन त्यामध्ये थोडी चहा पावडर, आलं, लवंग, वेलची, दालचिनी, गवती चहा, तुळस घालून हे सगळे चांगेल उकळू द्यावे. गरज वाटल्यास यामध्ये एखादा चमचा साखर घालावी पण नाही घातली तरी चालते. हा काढा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. यामुळे गारठा कमी वाटून शरीरात एकप्रकारची उष्णता निर्माण व्हायला मदत होते. दिवसातून साधारण २ ते ३ वेळा हा काढा आपण अर्धा कप घेऊ शकतो. त्यामुळे खवखवणाऱ्या घशालाही आराम मिळण्यास मदत होते. 

२. भाज्यांचे सूप

या काळात सहज मिळणाऱ्या बीट, गाजर, फ्लॉवर, फरसबी, मटार, भोपळा, कोबी यांसारख्या घरात उपलब्ध असणाऱ्या भाज्या भरपूर पाणी घालून चांगल्या उकळायच्या आणि मग त्या मिक्सरमध्ये बारीक करुन त्यामध्ये लिंबाचा रस, मीरपूड आणि मीठ घालून हे सूप प्यायचे. यामध्ये आपण पालक, कोथिंबीर अशा पालेभाज्यांचाही समावेश करु शकतो. भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असल्याने आरोग्यासाठी असे सूप घेणे अतिशय चांगले असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. कडधान्य किंवा डाळींचे सूप

कडधान्य आपण कुकरला शिजवायला लावतो तेव्हा त्यामध्ये काहीवेळा पाणी जास्त होते. हे पाणी बाजूला काढून ठेवायचे. तसेच यातील थोडे कडधान्य घेऊन त्यात आवडीनुसार आलं, लसूण आणि मिरचीचा बारीक तुकडा मिक्सर करुन घालायचा. हे मिश्रण, कडधान्याचे पाणी आणि त्याला वरुन जीऱ्याची फोडणी देऊन त्यात मीठ घालून ते पुन्हा चांगले उकळायचे. असेच आपण विविध प्रकारच्या डाळींचेही करु शकतो. याला काही ठिकाणी कढण असेही म्हणतात. कडधान्य आणि डाळींमध्ये प्रोटीन आणि इतर घटकांचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्यासाठी ते अतिशय चांगले असते.   

Web Title: 3 Easy Soup Recipe for Throat Irritation In Monsoon Home Remedy for Cough and Cold : Sore throat in rainy season? Take 3 soup instead of tea and coffee, your throat will get relief....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.