Join us  

उन्हाळ्यात कोथिंबीर महाग त्यात ती लवकर पिवळे पडते, ३ टिप्स- कोथिंबीर राहील हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:03 PM

3 Easy Tips to Store Coriander : अनेकदा कोथिंबीरीचे भाव इतके वाढतात की कोथिंबीरीचा वापरच कमी करावा लागतो.

कोथिंबीर हा असा पदार्थ आहे जो रोजच्या जेवणात लागतोच. सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर विकत घेतली की लगेच खराब होते सुकते  किंवा पिवळी पडते. अनेकदा कोथिंबीरीचे भाव इतके वाढतात की कोथिंबीरीचा वापरच कमी करावा लागतो. कोथिंबीर खराब होऊ नये जास्त दिवस टिकावी यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. या टिप्सच्या वापरानं दीर्घकाळ फ्रिजमध्ये कोथिंबीर स्टोअर करता येईल. ( How to keep Coriander leaves fresh for weeks)

1) सर्व प्रथम हिरव्या कोथिंबीरीच्या पानांचा एक बंडल घ्या नंतर देठ काढून घ्या. खराब झालेली किंवा पिवळी पाने तोडू नयेत. सर्व पाने तोडल्यानंतर टिश्यू पेपर बॉक्समध्ये ठेवा. (3 Easy Tips to Store Coriander) यानंतर त्यात कोथिंबीर टाका. यानंतर 2 टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर बॉक्स झाकून टाका. नंतर बॉक्सवर झाकण ठेवा. कोथिंबीर पूर्णपणे टिश्यू पेपरने झाकलेली असावी. आता हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवा. ही कोथिंबीर 15-20 दिवस ताजी राहतील.

ताकातला मऊ, जाळीदार ढोकळा करण्याची परफेक्ट पद्धत; मार्केटसारखा ढोकळा बनेल घरीच

2) कोथिंबिरीची पानं साठवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पेपरमध्ये बांधून ठेवणं, प्रथम सर्व कोथिंबीरीची पाने काढून घ्या आणि नंतर  पेपरमध्ये ठेवा. कागद पूर्णपणे गुंडाळा त्यात हवा अजिबात नसावी. यानंतर, कागद एका बॉक्समध्ये बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही ते 1 महिन्यासाठी वापरू शकता. कागद ओला झाला असेल तर लगेच बदला नाहीतर  हिरवी कोथिंबीर फार काळ टिकणार नाही.

3) कोथिंबीर आठवडे ताजी ठेवण्यासाठी तुम्ही हळद आणि पाणी वापरू शकता. यामुळे कोथिंबीर अधिक चांगली राहते आणि बरेच दिवस खराब होत नाही. बाजारातून आणलेली हिरवी कोथिंबीर मुळापासून वेगळी करून, पाने तोडून एका भांड्यात ठेवा. आता त्या भांड्यात थोडे पाणी आणि एक चमचा हळद घाला.

उन्हाळ्यात भूक कमी झाली तर करा कांदा-टोमॅटोची झणझणीत चटणी, चव अशी की भूक खवळेल

30 मिनिटांनंतर, कोथिंबीरची पाने भांड्यातून काढा, त्यांना धुवून वाळवा. नंतर ही पानं टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. जेणेकरून उरलेले पाणी कागद शोषून घेईल. आता एक बॉक्स घ्या आणि त्यात टिश्यू पेपर पसरवा. नंतर कोथिंबीर दुसऱ्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून बॉक्समध्ये ठेवा आणि त्याचे झाकण घट्ट बंद करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स