Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात कांदे सडतात - कोंब फुटतात? ३ जबरदस्त उपाय; घरातले कांदे खराब होणार नाही

पावसाळ्यात कांदे सडतात - कोंब फुटतात? ३ जबरदस्त उपाय; घरातले कांदे खराब होणार नाही

3 Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon : एकदम जास्त कांदे खरेदी केले असतील तर ३ गोष्टी लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 10:00 AM2024-07-12T10:00:13+5:302024-07-12T10:05:01+5:30

3 Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon : एकदम जास्त कांदे खरेदी केले असतील तर ३ गोष्टी लक्षात ठेवा..

3 Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon | पावसाळ्यात कांदे सडतात - कोंब फुटतात? ३ जबरदस्त उपाय; घरातले कांदे खराब होणार नाही

पावसाळ्यात कांदे सडतात - कोंब फुटतात? ३ जबरदस्त उपाय; घरातले कांदे खराब होणार नाही

पावसाळ्याचे आगमन होताच वातावरणात थंडावा निर्माण होतो (Monsoon). उन्हापासून काहीसा दिलासा मिळतो. या दिवसात कांद्याची भजी खाण्याचा मोह कोणाला आवरत नाही (Onions). काहीजण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून साठवून ठेवतात. अशावेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर, तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो.

कांदा व्यवस्थित साठवून ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतो. अन्यथा कांद्याला बुरशी लागते, ओलाव्यामुळे इतर कांदेही खराब होतात. कांदा साठवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहूयात(3 Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon).

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

स्वयंपाकघरात अशा पद्धतीने स्टोर करा कांदे

कांदे नेहमी उघड्या टोपलीत साठवून ठेवावे. लाकडी किंवा प्लास्टिकच्या टोपलीमध्ये कांदे साठवून ठेवावे. यामुळे हवा खेळती राहील, आणि ओलावा कांद्यामध्ये टिकून राहणार नाही. यामुळे कांदे अधिक महिने आरामात टिकतील.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

गोणीमध्ये साठवून ठेवा कांदे

कांदे मोठ्या प्रमाणात साठवायचे असतील तर त्यासाठी थंड, कोरडी आणि गडद जागा ही सर्वोत्तम जागा आहे. त्यामुळे कांदा नेहमी ओलावा किंवा पाणी नसलेल्या ठिकाणी साठवा. पाण्याच्या थोड्याशा संपर्कात आल्यावरही कांदे खराब होऊ लागतात. अशासाठी गोणीमध्ये कांदे स्टोर करून ठेवा.

कागदाचा वापर करा

पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. यासाठी कांदा खरेदी केल्यानंतर कागदावर पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेईल, ज्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाही, आणि दीर्घकाळ चांगले टिकतील.

Web Title: 3 Easy Ways to Prevent Onion Rot During Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.