Lokmat Sakhi >Food > आलं - लसणाची पेस्ट स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती, पेस्ट टिकेल वर्षभर, जेवण होईल झटपट... 

आलं - लसणाची पेस्ट स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती, पेस्ट टिकेल वर्षभर, जेवण होईल झटपट... 

3 Easy Ways To Store Ginger - Garlic Paste : आलं - लसणाची पेस्ट कशी तयार करायची आणि ती स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती लक्षात ठेवूयात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 01:39 PM2023-02-10T13:39:23+5:302023-02-10T13:56:19+5:30

3 Easy Ways To Store Ginger - Garlic Paste : आलं - लसणाची पेस्ट कशी तयार करायची आणि ती स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती लक्षात ठेवूयात. 

3 easy ways to store ginger-garlic paste, the paste will last for a year, the meal will be ready on time... | आलं - लसणाची पेस्ट स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती, पेस्ट टिकेल वर्षभर, जेवण होईल झटपट... 

आलं - लसणाची पेस्ट स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती, पेस्ट टिकेल वर्षभर, जेवण होईल झटपट... 

आलं - लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं - लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं - लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं - लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो. ज्यामुळे जेवणाची चव आणि मूड दोन्ही खराब होते. अशावेळी आलं - लसणाची पेस्ट तयार करून आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो. आलं - लसणाची पेस्ट कशी तयार करायची आणि ती स्टोअर करण्याच्या ३ सोप्या पद्धती लक्षात ठेवूयात(3 Easy Ways To Store Ginger - Garlic Paste).

साहित्य :- 

१. आलं - पाव किलो

२. लसूण - पाव किलो 
३. मीठ - चवीनुसार 
४. तेल -  १ टेबलस्पून

 

कृती :- 

१. सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात. 
२. आल्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. 
३. आलं - लसूण यांची पेस्ट तयार करताना आलं - लसूण हे सम प्रमाणात घ्यावे. 
४. एका मिक्सरच्या भांड्यात आलं - लसूण घालून त्यात चवीनुसार मीठ व १ टेबलस्पून तेल घाला.

५. आता मिक्सरला वाटून त्याची जाडसर घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. 
६. ५ मिनिटे ती पेस्ट मिक्सरच्या भांड्यात तशीच ठेवून मग पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ती पेस्ट जाडसर भरडून घ्यावी. 
७. ही तयार झालेली आलं - लसूण पेस्ट एका हवाबंद बरणीत भरून ठेवा. जशी गरज लागेल तशी आपण ही आलं - लसूण पेस्ट वापरू शकता. 

 

आलं - लसूण पेस्ट स्टोअर करून ठेवण्याच्या ३ सोप्या पद्धती :- 

१. जर आपल्याला आल आणि लसूण पेस्ट ४ ते ६ महिन्यांसाठी स्टोअर करायची असेल तर यासाठी आपण आइस ट्रेचा वापर करू शकता. बर्फाच्या ट्रेमध्ये चमच्याच्या मदतीने पेस्ट भरा, त्याला प्लास्टिक रॅपरने रॅप करा आणि १२ तास फ्रिजरमध्ये ठेवा. बारा तासांनंतर जेव्हा ते बर्फाच्या क्यूबमध्ये बदलते, तेव्हा एक एक करून बाहेर काढा आणि मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करा आणि ते झिप लॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवा. आता ते फ्रिजमध्ये ठेवा आणि जेव्हाही भाजी बनवताना गरज असेल तेव्हा वापरू शकता.

२. दुसर्‍या पर्यायाने आले लसूण पेस्ट साठवण्यासाठी, २५० ग्रॅम आल आणि २५० ग्रॅम लसूण सोलून, चांगले धुवा आणि पाणी कोरडे करा. आता मिक्सरच्या भांड्यात आले टाका आणि त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. याचपद्धतीने लसूणची देखील वेगळी पेस्ट तयार करा. आले आणि लसूण वेगवेगळे बारीक करून घ्यावेत हे लक्षात ठेवा. यानंतर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या भांड्यात काढून घ्या. वरून दोन चमचे रिफाइंड तेल टाकून मिक्स करा. आता या दोन्ही पेस्ट दोन वेगळ्या हवाबंद डब्यात भरून ठेवता येतील. 

३. तिसऱ्या पद्धतीनुसार, आले चांगले सोलून किसून घ्या. आता पेपरवर पसरवा, नंतर उन्हात वाळवा आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. लसूण न सोलता धुवून घ्या, आता त्याचे पाणी काढून टाका. त्यानंतर हे सालासकट थोडे जाडसर वाटून घ्या. आता उन्हात वाळवा. वाळल्यावर त्याची साल वेगळी करून मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यावी. तुमचे आले आणि लसूण पावडर तयार आहे. आता ते हवाबंद डब्यात स्टोअर करा. जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून ही पावडर वापरू शकता.

Web Title: 3 easy ways to store ginger-garlic paste, the paste will last for a year, the meal will be ready on time...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.