Join us  

प्रवासात ३ पदार्थ कायम सोबत ठेवा- लहान मुलांसाठीही उत्तम, अजिबात थकवा येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 4:01 PM

Travelling Tips Regarding Food: प्रवासाला जाताना ३ प्रकारचे पदार्थ कायम सोबत ठेवले तर प्रवासाचा त्रास, शीण, थकवा अजिबात येणार नाही. (3 foods you should carry with you when travelling)

ठळक मुद्देकाही दिवस घराच्या बाहेर राहणार असाल तर ३ प्रकारचे पदार्थ कायम सोबत ठेवा असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे.

प्रत्येकजण कधी ना कधी प्रवासाला जात असतो. लहान- मोठ्या सहली नेहमीच केल्या जातात. आता उन्हाळी सहलींचा हंगाम संपत आला असला तरी मान्सून ट्रिपसाठी अनेकांची तयारी सुरू झालेली आहे. साधारण जूनच्या अखेरपासून मान्सून सहलींची धूम सुरू होते. पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त तुम्ही प्रवासाला जाणार असाल, काही दिवस घराच्या बाहेर राहणार असाल तर ३ प्रकारचे पदार्थ कायम सोबत ठेवा असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे (best food to carry for trip). ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कधी खावेत, याची त्यांनी दिलेली ही माहिती पाहा..(3 foods you should carry with you when travelling)

प्रवासाला जाताना कोणते ३ पदार्थ सोबत ठेवावे?

 

१. नाचणीचे लाडू

ऋजुता दिवेकर सांगतात की प्रवासाला जाताना तुमच्यासोबत नाचणीचे लाडू अवश्य ठेवा.

जागतिक पोहे दिवस: पोह्यांचे एक से एक चवदार प्रकार, बघा यापैकी तुम्ही किती खाऊन पाहिले?

प्रवासात एखाद्या वेळी काही खायला मिळालं नाही तर त्यावेळी नाचणीचा एखादा लाडू जरी खाल्ला तरी तो तुमची एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत करतो. प्रवासात बऱ्याचदा पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे मग डिहायड्रेशन, कॉन्स्टीपेशन असा त्रास होतो. पण नाचणीच्या लाडूमध्ये असणाऱ्या तूप आणि गूळ या दोन घटकांमुळे तो त्रास होत नाही. शिवाय लहान मुलांसाठीही नाचणीचा लाडू उत्तम आहे.

 

२. सुकामेवा

प्रवासात सुकामेवा हमखास तुमच्यासोबत असू द्या. शक्य झालं तर सुकामेवा खारवून घ्या म्हणजेच त्याला थोडं मीठ लावून घ्या. सुकामेवाही एनर्जीचा मोठा स्त्राेत आहे.

पाळीमध्ये पोट खूप दुखत असेल तर 'या' पद्धतीने केशर खा, पोटदुखीचा त्रास होईल कमी

अनेकदा एनर्जी बुस्टर म्हणून तो काम करतो. सकाळच्यावेळी सुकामेवा आठवणीने खा. यामुळे प्रवासाचा थकवा, शीण येणार नाही. 

 

३. सुका नाश्ता

सुका नाश्ता या प्रकारात घरी तयार केलेला चिवडा, चकल्या, शेव असे प्रकार येऊ शकतात. चकल्या, शेव या तेलकट पदार्थांपेक्षा सुकामेवा, शेंगदाणे घालून तयार केलेला चिवडा खाणे अधिक चांगले.

बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश

यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. प्रवासादरम्यान तुम्हाला जेव्हा केव्हा भूक लागेल तेवढा इतर कोणतेही जंक पदार्थ खाण्यापेक्षा घरचा चिवडा खाणं कधीही चांगलं. 

 

टॅग्स :अन्नट्रॅव्हल टिप्स