Join us  

घरातला लसूण संपला? ऐनवेळी लसणाऐवजी वापरा ३ गोष्टी, पदार्थ होईल रुचकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 1:54 PM

3 Garlic Substitutes That Taste Like The Real Thing : लसणाऐवजी करून पाहा ३ गोष्टींचा वापर, लसूण घालण्याची गरज पडणार नाही..

फोडणीमध्ये कांदा, लसूण घालताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. फोडणी देताना आपण कांदा किंवा लसणाचा वापर करतोच. लसणाच्या फोडणीशिवाय वरणाची चव वाढत नाही. पण बऱ्याचदा घरात लसूण नसतो, किंवा सध्या लसणाच्या वाढत्या दरामुळे बरेच जण लसूण खाणं टाळतात. तर काही जण लसणाच्या उग्र गंधामुळे खाणं टाळतात (Kitchen Hacks). पण ऐनवेळी घरात लसूण उपलब्ध नसेल तर? किंवा लसणाच्या वाढत्या दरामुळे आपण लसूण खाणं टाळत असाल तर, त्याव्यतिरिक्त आपण ३ गोष्टींचा वापर करू शकता (Cooking Tips).

यामुळे पदार्थाची चव वाढेल, शिवाय कमी किमतीत हे ३ साहित्य आपल्याला मिळतील(3 Garlic Substitutes That Taste Like The Real Thing).

पदार्थात घालायला घरात लसूण नसेल तर?

लसणाच्या पाती

लसणाच्या हिरव्या पातीचा वापर आपण फोडणीमध्ये करू शकता. यामुळे पदार्थाची चव वाढते, शिवाय आपल्याला मार्केटमध्ये कमी दरात मिळेल. लसणाच्या पातीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, ई, के, फायबर, प्रोटीन, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम इत्यादी घटक आढळतात. जे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

मटकीला मोड नाही आणि या टिपला तोड नाही, एका दिवसात कडधान्यांना येईल लांबसडक मोड-पाहा ट्रिक

हिंग

फोडणीमध्ये चिमुटभर हिंग घालताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. हिंगाला लसणासारखा तिखट गंध असतो. त्यामुळे लसणाऐवजी आपण फोडणीत हिंगाचा वापर करू शकता.

मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

लसूण पावडर

जर आपल्याला लसूण आवडत नसेल किंवा लसूण साठवून ठेवण्यात अडचण येत असेल तर, लसणाऐवजी लसूण पावडरचा वापर करून पाहा. ग्रेव्ही असो किंवा भाजी आपण पदार्थात लसूण पावडर मिक्स करू शकता. शिवाय या पावडरची शेल्फ लाइफ देखील जास्त आहे. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स