Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेल्दी आणि टेस्टी हाय प्रोटीन सूप, चरबी होईल कमी अन् वजनही घटेल!

हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेल्दी आणि टेस्टी हाय प्रोटीन सूप, चरबी होईल कमी अन् वजनही घटेल!

High Protein Soups : तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता. सूपच्या अशाच काही खास रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:23 AM2024-12-10T11:23:47+5:302024-12-10T11:24:20+5:30

High Protein Soups : तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता. सूपच्या अशाच काही खास रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

3 high protein soup to drink in winters to weight loss and fat burn | हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेल्दी आणि टेस्टी हाय प्रोटीन सूप, चरबी होईल कमी अन् वजनही घटेल!

हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेल्दी आणि टेस्टी हाय प्रोटीन सूप, चरबी होईल कमी अन् वजनही घटेल!

High Protein Soups : वाढलेला लठ्ठपणा आणि पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी हाय प्रोटीन असलेला आहार खूप फायदेशीर मानला जातो. याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रोटीनमध्ये कॅलरी कमी असतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा भूकही लागत नाही. काही सूप असे असतात ज्यांमध्ये प्रोटीनसोबतच फायबरही भरपूर असतं. जे वजन कमी करण्यास मदत करतं. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर काही टेस्टी आणि हेल्दी सूपचं सेवन करू शकता. सूपच्या अशाच काही खास रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रोटीन सूप पिण्याचे फायदे

प्रोटीनयुक्त सूपमुळे आराम तर मिळतोच सोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते. प्रोटीन भूख हार्मोनना कंट्रोल करतं. ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची ईच्छा होत नाही. त्याशिवाय काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, हाय प्रोटीनच्या सेवनाने मसल्स मास रिटेंशन आणि मेटाबॉलिज्मला खूप सपोर्ट मिळतो. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

१) डाळीचं सूप

इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्यूलर सायन्सेजमध्ये एका रिसर्चनुसार, सगळ्यात चांगल्या हाय प्रोटीन सूपमध्ये डाळीच्या सूपचा समावेश केला जातो. ज्यात प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 

डाळीच्या सूपसाठी साहित्य

१ कप मूगाची डाळ, १ कापलेलं गाजर , १ कापलेला कांदा, १ लसणाच्या कळ्या, ४ कप भाज्यांचं उकडलेलं पाणी, १ चमचा जिरे, मीठ आणि मिळी मिरी टेस्टनुसार.

कसं कराल तयार?

एका भांड्यात कांदा आणि लसूण नरम होईपर्यंत भाजा. नंतर त्यात गाजर, जिरे आणि डाळ टाका. या सगळ्यात गोष्टी २ मिनिटे परतवा. आता त्यात पाणी आणि भाज्यांचा पाणी टाकून उकडू द्या. डाळ साधारण ३० ते ४० मिनिटे शिजवा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर टाका.

२) चणे आणि मशरूम सूप

अमेरिकन एग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार, १०० ग्रॅम चण्यांमध्ये २१ ग्रॅम प्रोटीन आणि १२ ग्रॅम फायबर असतं. या पोषक तत्वांमुळे भूक कंट्रोल राहते आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. दुसरीकडे मशरूममध्ये कॅलरी कमी असतात आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. 

साहित्य

१ वाटी सुकलेले आणि धुतलेले छोले, १ कप कापलेले मशरूम, १ कापलेला कांदा, लसणाच्या २ कळ्या, ४ कप उकडलेल्या भाज्यांचं पाणी, १ चमचा ओवा, मीठ आणि काळी मिरी टेस्टनुसार.

कसं तयार कराल?

एक भांड्यात कांदा आणि लसूण सुगंध येईपर्यंत भाजा. नंतर त्यात मशरूम टाका आणि नरम होऊ द्या. नंतर त्यात छोले, ओवा आणि भाज्यांचं पाणी टाका. मीठ, काळी मिरी पावडर टाकून या सगळ्या गोष्टी उकडून घ्या. तुमचं सूप तयार आहे.

३) मटार सूप

अमेरिकन अ‍ॅग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार, मटारच्या दाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. तसेच ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते. मटारमध्ये फॅटही कमी असतं. इतकंच नाही तर यात फोलेट आणि आयर्नसारखे पोषक तत्वही असतात. 

साहित्य

१ कप मटार, १ कापलेलं गाजर, थोडा ओवा, १ कापलेला कांदा, ४ कप भाज्यांचं उकडलेलं पाणी, १ चमचा थाइम, मीठ आणि काळी मिरी.

कसं तयार कराल?

एका भांड्यात कांदा, गाजर आणि ओवा भाजून घ्या. त्यात मटार, भाज्यांचं पाणी टाकून कमी आसेवर ३० ते ४० मिनिटे उकडा. यात मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून सर्व्ह करा.

Web Title: 3 high protein soup to drink in winters to weight loss and fat burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.