Join us  

...म्हणून आंबा पाण्यात भिजवल्याशिवाय अजिबात खाऊ नका, आहारतज्ज्ञ सांगतात ३ महत्त्वाची कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 7:00 PM

3 Reasons Why You Should Sock Mangoes Before Eating : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ सांगतात आंबा खाताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी

आंबा म्हणजे फळांचा राजा, उन्हाळ्यात आंब्याचा सिझन असल्याने आपण सगळेच आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कधी एकदा हा आंबा येतो आणि आपण खातो असे आपल्याला होऊन जाते. मग आमरस-पुरी, आमरस पोळी असे बेत रंगतात. आंबा चिरुन खाणे, आंब्याचा मिल्क शेक, आंब्याचा शिरा, मँगो आईस्क्रीम किंवा मिल्क शेक असे काही ना काही प्रकार करतो. आंबा हे फळ आरोग्यासाठी अतिशय चांगले असते असे आपण ऐकतो (3 Reasons Why You Should Sock Mangoes Before Eating). 

आंब्यामध्ये लोह, मॅंगनिज, व्हिटॅमिन ए, सी यांबरोबरच इतरही अनेक उपयुक्त घटक असतात. असे असले तरी आंबा प्रकृतीने उष्ण असतो. तसेच आंब्याच्या वरच्या बाजूला थोडा चिकही असतो. त्यामुळे आंबा खाताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ यांनी आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. आंबा खाण्याआधी तो पाण्यात भिजवून ठेवायला हवा असे श्वेता सांगतात. यामागे नेमकी शास्त्रीय कारणे कोणती याविषयी त्या काय सांगतात पाहूया...

(Image : Google)

१. आंब्याच्या सालामध्ये पायटीक अॅसिड नावाचे एक अॅसिड असते. या अॅसिडमुळे आपण अन्नपदार्थांतून घेत असलेले व्हिटॅमिन्स कमी होतात. यामध्ये प्रामुख्याने शरीरातील कॅल्शियम, झिंक, आर्यन हे घटक कमी होतात. त्यामुळे सालावर असलेला हा घटक निघून जाण्यासाठी हे आंबे पाण्यात भिजवून ठेवणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते. 

२. पायटीक अॅसिडमुळे शरीरातील थर्मोजेनेसिस प्रोसेस वाढते. यामुळे त्वचेशी संबंधित आणि मुरुम किंवा पुरळांशी संबंधित समस्या निर्माण होतात. म्हणून आंबे नुसते धुवून खाण्यापेक्षा ते बराच वेळ पाण्यात भिजवून ठेवून मग खाल्लेले केव्हाही चांगले.   

३. फळं आणि भाज्या दिर्घकाळ टिकाव्यात यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात किटकनाशके मारण्यात येतात. ही किटकनाशके आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. अनेकदा आपण आंबा कापून खातो तेव्हा आपण साल तोंडात घालतो. किंवा आंब्याचा रस काढतानाही सालं दाबून रस काढतो. आंबा पाण्याने धुवून घेतला असला तरी एकदा पाण्याने धुतल्यास त्यावरील किटकनाशके जातात असे नाही. त्यामुळे आंबा पाण्यात भिजवून ठेवायला हवा. त्यामुळे त्यावरील किटकनाशके निघून जाण्यास मदत होते आणि आपल्याला त्यातून कोणतीही बाधा होत नाही. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.फळेआंबा