Lokmat Sakhi >Food > सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ 

सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ 

Tips And Tricks For Saving Oil While Frying: तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय एकदा करून पाहा. कमी तेलातही भरपूर पदार्थ तळून होतील, कारण पदार्थ कमी तेल शाेषून घेतील. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2023 12:39 PM2023-09-06T12:39:52+5:302023-09-06T12:40:35+5:30

Tips And Tricks For Saving Oil While Frying: तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय एकदा करून पाहा. कमी तेलातही भरपूर पदार्थ तळून होतील, कारण पदार्थ कमी तेल शाेषून घेतील. 

3 rules for deep frying, Tips and tricks for saving oil while frying, How to deep fry pakoda aur vada with minimum oil? | सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ 

सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ 

Highlights३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कारण यामुळे एक तर तेल कमी लागेल आणि दुसरे म्हणजे पदार्थ जास्त तेल शोषून घेणार नाही.

तळलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी फार काही चांगलं नसतं, हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही काही सणावाराच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा कधी खमंग तळलेलं खाण्याची इच्छा झाल्यामुळे घरी तळणं होतच. तळलेले पदार्थ पानात असले की जेवणाची रंगत वाढते, यात काही वादच नाही. म्हणूनच जर कधी घरी एखादा पदार्थ तळणार असाल, तर पुढे सांगितलेल्या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा (3 rules for deep frying). कारण यामुळे एक तर तेल कमी लागेल आणि दुसरे म्हणजे पदार्थ जास्त तेल शोषून घेणार नाही. (How to deep fry pakoda aur vada with minimum oil?)

 

कोणताही पदार्थ तळताना ३ गोष्टी लक्षात ठेवा.
हा उपाय इंस्टाग्रामच्या foujiwife_shweta या पेजवर शेअर केला आहे.

गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक
१. या व्हिडिओमध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ तळणार असाल तेव्हा कढईतल्या गरम तेलामध्ये थोडंसं मीठ टाका. यामुळे तेल कमी लागेल. कमी तेलात जास्त पदार्थ तळून होतील.

२. कोणत्याही प्रकारची भजी किंवा वडे तळणार असाल तर त्या भजी किंवा वड्यांच्या पीठामध्ये लिंबाचा रस टाका. यामुळे भजी किंवा वडे तेल जास्त शोषून घेणार नाहीत. शिवाय लिंबाच्या रसामुळे पदार्थाची चवही आणखी खुलेल.

 

३. एकदा तळलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

गोकुळाष्टमी : नैवैद्याची पंजिरी करण्याची पारंपरिक सुगंधी रेसिपी, चिमूटभर पंजिरीही आरोग्यासाठी मोलाची

पण जर तुम्ही तेच तेल पुन्हा तळण्यासाठी वापरणारच असाल तर त्या तेलातून फेस येतो आणि तळल्या जाणाऱ्या पदार्थांना थोडासा करपट वास येतो. असं होऊ नये म्हणून त्या तेलात चिंचेचा एक छोटासा तुकडा टाका. तेलाला फेस येणार नाही आणि पदार्थाला करपट वास येणार नाही.

 

Web Title: 3 rules for deep frying, Tips and tricks for saving oil while frying, How to deep fry pakoda aur vada with minimum oil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.