सुपरफूडची चर्चा सध्या तुफान आहे. तुम्ही इन्स्टावर असाल तर कळेल की एकेकाळी आपल्या आज्या खायच्या त्या बियांच्या चटण्या आता सुपरफूड म्हणून येत आहेत. आळशी, खुरासनी, जवस, शेंगदाणे, कढीपत्ता हे सारे सुपरफूड होत आहे. कुणी पाण्यात टाकून पिते तर कुणी भाजून खा म्हणते. पण मग आपला पारंपरिकच आहार, चविष्ट आणि मापात खाणे हेच का करु नये? त्यातही वजनाचा धाक दाखवून कमी लेखणाऱ्या जगाचा भाग होण्यापेक्षा पदार्थ आनंदाने खाऊन का आरोग्यसंपन्न होवू नये? क्रेझी डाएट्स येतात जातात. सुपरफूड म्हणून बऱ्याच चर्चा होते. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या हेल्थ सप्लीमेण्ट अहवालानुसार जर वजन कमी करायचं असेल तर काही बियांचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. कारण वजन कमी करताना आपलं शरीर पोखरुन काढायचं नाही, खंगवायचं नाही. तुम्ही जर या बिया पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपली आजी, आई त्यांच्या उत्कृष्ट चटण्या करतच होती.. अळशी, तीळ, अळीव, कारळं, यांच्या चटण्या चमचारभर रोज खाल्ल्या तरी आहारात भरपूर पोषण मिळू शकतं.
३ बिया. त्यांचा वापर आहारात लाभदायक.
१. भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया फार पौष्टिक असतात. त्यात झिंक भरपूर असते. टेस्टोस्टेरॉन हे होर्मोन वाढीसही त्यांची मदत होते. मसल टोन करायचे असतील. वाट ट्रेनिंग करत असाल तरी भोपळ्याच्या बिया खाणं उत्तम.
२) सूर्यफुलाच्या बिया
या बिया भाजून सोलून खाता येतात. त्यांची चटणीही करता येते.
3) अळशीच्या बिया
भरपूर लोह, प्रोटीन, फायबर देणारी अळशीची चटणी रोज आहारात घेतली तर उत्तम. थंडीत कफ होतो त्यासाठीही अळशीच्या बिया उपयुक्त. त्यामुळे मस्त अळशीची चटणी करा. काढा करुन खा. बडीशोपमध्ये भाजून ठेवल्या तर मुखवास म्हणूनही उत्तम.