Join us  

थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 1:52 PM

Food and recipe: रोज रोज नाश्त्याला काय पदार्थ करावेत, असा प्रश्न पडतो. म्हणूनच तर हे घ्या त्याचं एक सोपं उत्तर... 

ठळक मुद्देहे पदार्थ बनवायला खूप वेळही लागत नाही, शिवाय हे पदार्थ चटकदार असल्याने खाणारेही ते खूप छान एन्जॉय करतात... 

नाश्ता आणि जेवण हे दोन महिलांपुढचे रोजचे मोठे प्रश्न. जेवायला काय करायचं आणि नाश्ता काय करायचा, याचा काही चटकन उलगडा होत नाही. कारण हे पदार्थ सगळ्यांना आवडणारे हवे आणि शिवाय हेल्दीही पाहिजेत. म्हणूनच तर हे बघा काही यम्मी आणि सुपरहेल्दी पदार्थ. हे पदार्थ बनवायला खूप वेळही लागत नाही, शिवाय हे पदार्थ चटकदार असल्याने खाणारेही ते खूप छान एन्जॉय करतात... 

 

१. ॲपल ओट्स स्मुदीएका सफरसंदचे काप, बदाम, ओट्स आणि चिया सीड्स हे सगळं एकत्र करा. त्यात थोडी दालचिनी पावडर टाका आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करा. त्यानंतर पॅन गरम करायला ठेवा. गरम झाल्यावर त्यात ही पेस्ट टाका. वरून थाेडं पाणी टाका. थोडा गुळ टाका. मिश्रणाला उकळी येऊन ते थोडे शिजू द्या. अवघ्या १० मिनिटांत झाली तयार ॲपल ओट्स स्मुदी.

 

२. ओट्स पालक पराठा.ओट्समध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन्स आणि झिंक असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असतात. या ओट्सला जेव्हा पालकाची जोड मिळते, तेव्हा ते मिश्रण तर अधिकच पौष्टिक होते. त्यामुळे नेहमीच्या स्टाईलने पराठे करण्यापेक्षा ओट्स पालक पराठा करून बघा. यासाठी एक वाटी ओट्स घ्या. त्यात अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाका. त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पालक, लसूण- अद्रक पेस्ट, हिरवी मिरची चवीनुसार तिखट मिठ टाका. दही टाकून पीठ मळून घ्या आणि पराठे लाटा. गरमागरम ओट्स पालक पराठे लोणच्यासोबत टेस्टी लागतात. 

 

३. नाचणीची खीरलहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी सगळ्यांना चालते. त्यामुळे हा नाश्ता घरातले सगळेच एन्जॉय करतात. नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात झिंक आणि लोह असल्याने हा नाश्ता सुपर हेल्दी आहे. नाचणीची खीर करण्यासाठी नाचणी आणि गाजर एकत्र करा आणि वाटून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा.त्यात तूप टाका. तूप गरम झाले की त्यात त्यात आपण वाटलेलं नाचणी आणि गाजर टाका. मिश्रण परतून घेतल्यावर त्यात थोडे दूध टाका. उकळी येऊ लागल्यावर चमचाभर गुळाची पावडर टाका आणि खिरीला उकळी येऊ द्या. गरमागरम नाचणीची खीर खायला तयार.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यआहार योजना