बऱ्याचदा असं होतं की चपात्या किंवा पोळ्या खूप जास्त उरतात. या पोळ्या भाजीसोबत खाण्याचाही कंटाळा येतो. पोळ्या उरल्या की बऱ्याच घरांमध्ये त्याचा कुस्करा केला जातो. पण नेहमीच कुस्करा खाण्याचीही इच्छा होत नाही. म्हणूनच उरलेल्या पोळ्यांचे हे काही चटपटीत पदार्थ ट्राय करून बघा. लहान मुलांसकट वयस्कर व्यक्तींनाही खूप आवडतील आणि अगदी हा हा म्हणता सगळ्या पोळ्या संपून जातील.
१. मसाला पोळी
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे मसाला पोळी. मसाला पोळी करण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाला की त्यावर थोडं तूप घाला.
भराभर लसूण सोलण्याची ही भन्नाट ट्रिक पाहिली का?- ५ मिनिटांत सोलून होईल १ किलाे लसूण
तूप वितळल्यानंतर तव्यावर पोळी ठेवा. त्या पोळीला वरच्या बाजूने सॉस लावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, काकडी, चाट मसाला, बारीक शेव असं सगळं घालून त्याला दोन्ही बाजूंनी दुमडून घ्या. मसाला पोळी झाली तयार.
२. पनीर रोल
पनीरचे बारीक तुकडे करा. गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये पनीर, सिमला मिरची, पत्ताकोबी, कांदा, टोमॅटो अशा सगळ्या भाज्या घालून थोडसं परतून घ्या.
डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच...
यामध्ये टोमॅटो सॉस आणि तुमच्या घरात असणारे इतर मसालेही टाकू शकता. आता एक पोळी घ्या. तिला तव्यावर गरम करायला ठेवा. पोळीच्या खालच्या बाजुला बटर लावा. वरच्या बाजूला थोडसं बटर आणि टोमॅटो सॉस लावून त्यावर तयार केलेलं पनीरचं सारण भरा आणि त्याचा रोल करा.
३. क्रिस्पी पोळ्या
उरलेल्या पोळ्या थोड्या मोकळ्या पसरवून ठेवा. त्या थोड्या कडक झाल्या की तेलात खरपूस तळून घ्या.
मान- पाठ- खांदे खूप दुखतात? पाण्याची बाटली घेऊन करा 'हा' व्यायाम- आखडलेले स्नायू होतील मोकळे
तळून कुरकुरीत झालेल्या पोळीच्या तुकड्यांवर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव टाकून ती तुम्ही अगदी पापडासारखी खाऊ शकता.