Join us

अग्गबाई! सुक्या भाजीत तेल जास्त पडलं? टेंन्शन न घेता करा ३ ट्रिक्स, तेल होईल चटकन कमी-भाजी टेस्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 15:41 IST

How To fix extra spicy food : How To Remove Excess Cooking Oil From Dry Sabji : 3 Genius Hacks To Remove Excess Oil From Dry Sabji : 3 tricks to remove extra oil from Dry Sabji : रस्सा किंवा ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांमधील जास्तीचे तेल काढता येत, पण सुक्या भाजीतील तेल कसं काढावं ते पाहा..

आपल्या सगळ्यांच्याच घरात रोज एक ओली आणि सुकी अशा दोन प्रकारच्या भाज्या तयार केल्या जातात. या भाज्यांमध्ये आपण तेल, मीठ, साखर, तिखट सगळे पदार्थ अगदी गरजेनुसार ( 3 tricks to remove extra oil from Dry Sabji) बेतानेच घालतो. आजकाल बरेचसेजण आपल्या हेल्थची खूप काळजी घेतात. हेल्थ कॉन्शियस असताना बरेचजण रोजचे जेवण तयार करताना अगदी कमी तेलाचा  (extra oil in food) वापर करतात. परंतु कधी घाई गडबडीच्या वेळी किंवा चुकून आपल्या हातून तेल जास्त पडत. एखाद्या पदार्थात प्रमाणापेक्षा जास्त तेल पडलं तर अशी तेलकट भाजी खायला कुणालाच आवडत नाही(How To Remove Excess Cooking Oil From Dry Sabji).

जर एखाद्या रस्सा भाजीत आपल्याकडून तेल जास्त पडलं गेलं तर त्यावर तेलाचा तवंग येतो, असा तवंग आपण चमच्याने काढू शकतो. परंतु जर सुक्या भाजीत तेल जास्त झालं तर नेमक करायचं काय हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. सुक्या भाजीत तेल जास्त झालं तर आपल्याला या भाजीतील तेल काढणे शक्य होत नाही. अशावेळी अजिबात टेन्शन घेऊ नका. जर सुक्या भाजीत तेल जास्त झाले तर काही सोप्या ट्रिक्स वापरुन आपण या सुक्या भाजीतील तेल अगदी सहजपणे काढू शकतो. या ट्रिक्सचा वापर केल्याने तुमच्या सुक्या भाजीतील तेल तर नक्कीच कमी होईल पण भाजी हमखास अधिक चवदार होईल हे नक्की. सुक्या भाजीतील तेल काढून टाकण्याच्या काही भन्नाट ट्रिक्स पाहूयात. 

सुक्या भाजीतील जास्त झालेले तेल कसे काढावे? 

१. सुक्या भाजीतील तेल कमी करण्यासाठी आपल्याला एक स्टीलची वाटी लागणार आहे. ही ट्रिक करताना कढईत शिजत असलेल्या सुक्या भाजीच्या बरोबर मधोमध ही स्टीलची वाटी उलटी ठेवून द्यावी. (वाटीचा पृष्ठभाग वरच्या बाजूला असावा) त्यानंतर या कढईवर झाकण ठेवून द्यावे. ५ ते १० मिनिटे भाजी मंद आचेवर शिजवून घ्यावी. त्यानंतर झाकण उघडून वाटीच्या भोवती असलेली भाजी चमच्याने काढून घ्यावी. सगळी भाजी काढून घेतल्यानंतर उलटी ठेवलेली वाटी उचलावी या वाटी खाली सुक्या भाजीतील जास्तीचे तेल साचून राहते. या सोप्या ट्रिकमुळे आपण सुक्या भाजीतील जास्तीचे तेल अगदी सहजपणे काढू शकतो. 

आजी म्हणायची ‘मोरावळा' खा, वर्षभर निरोगी राहा! पाहा मोरावळा करण्याची पारंपरिक रेसिपी...

रताळं उकडलं की लगदा होतो- पचपचीत लागते? १ भन्नाट ट्रिक, २ मिनिटांत रताळे उकडेल...

२. सुकी भाजी करत असताना तेल जरा जास्त पडलं तर एक सोपा उपाय म्हणजे कढई थोडी तिरकी करा. भाजी चमच्याने दाबा आणि त्यातून निथळणारं तेल चमच्याने काढून टाका.

३. दुसरा उपाय म्हणजे कोणत्याही सुक्या भाजीत तेल जास्त झालं तर त्यात एक तर दाण्याचा कुट टाका किंवा मग थोडं बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ टाका. पीठ टाकण्याआधी ते कढईत किंवा तव्यावर थोडंसं भाजून घ्यावं आणि नंतर टाकावं. म्हणजे भाजी अधिक खमंग कुरकुरीत होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स