Join us  

धो धो कोसळणाऱ्या पावसात खा मक्याचे ३ मसालेदार पदार्थ, मक्याच्या दाण्यांची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 12:34 PM

3 Types of Corn Chaat Recipe : 3 Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes : मक्याचे कणीस खाण्यापेक्षा करा चटपटीत मक्याच्या दाण्यांच्या झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपी...

धो धो कोसळणाऱ्या पावसात गरमागरम मीठ - मसाला लावलेले मक्याचे कणीस खाणे म्हणजे सुख. पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं अनोखं नातं आहे. आपल्याकडील पावसाळा हा मक्याच्या कणसाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. पावसाळ्याच्या दिवसांत मक्याचे दाणे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तिखट - मीठ आणि लिंबाचा रस पिळलेला मका खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही(How to Make Street Style Corn Chaat At Home).

भाजलेलं मक्याचं कणीस आणि उकडलेला मका हे दोन्ही आपण आवडीने खातो. अनेकवेळा आपण नाश्त्यात मक्यापासून तयार केलेले विविध पदार्थ खातो. आपल्याकडे कॉर्न पॅटिस, कॉर्न भेळ, कॉर्न पुलाव, कॉर्न सूप असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यंदाच्या पावसाळ्यात मक्याच्या दाण्यांनी बनवलेले कॉर्न चाटचे नवीन तीन प्रकार नक्की ट्राय करून पाहा (corn chaat recipe).

कॉर्न चाट कसे बनवावे ? 

tarladalal यांच्या इंस्टाग्राम पेजवरून कॉर्न चाटच्या वेगवेगळ्या तीन प्रकारच्या रेसिपी शेअर करण्यात आल्या आहेत. कॉर्न चाट तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यासाठी उकडवून घेतलेले मक्याचे दाणे व बटर या दोन गोष्टी सगळ्या रेसिपीत कॉमन लागणार आहेत. 

१. स्पायसी मसाला कॉर्न :- स्पायसी मसाला कॉर्न बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये उकडवून घेतलेले मक्याचे दाणे घ्या. आता यात १ टेबलस्पून बटर घालून घ्यावे. त्यानंतर प्रत्येकी १/२ टेबलस्पून लाल तिखट मसाला व चाट मसाला घालावा. सगळ्यांत शेवटी यात चवीनुसार मीठ व २ टेबलस्पून लिंबाचा रस घालून सगळे जिन्नस चमच्याने मिक्स करून, स्पायसी मसाला कॉर्न खाण्यासाठी सर्व्ह करावेत.  

उरलेल्या भाताचा नेहमी फोडणीचा भातच का करावा ? ही घ्या एक झटपट होणारी मसालेदार रेसिपी... 

२. पेरी पेरी मसाला कॉर्न :- पेरी पेरी मसाला कॉर्न बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये उकडवून घेतलेले मक्याचे दाणे घ्या. आता यात १ टेबलस्पून बटर घालून घ्यावे. त्यानंतर या मक्याच्या दाण्यांमध्ये २ टेबलस्पून पेरी पेरी मसाला व १ टेबलस्पून लिंबाचा रस घालावा. सगळे जिन्नस चमच्याने मिक्स करून, पेरी पेरी मसाला कॉर्न खाण्यासाठी सर्व्ह करावेत.  

३. चिली चीज कॉर्न :- चिली चीज कॉर्न बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये उकडवून घेतलेले मक्याचे दाणे घ्या. आता यात १ टेबलस्पून बटर घालून घ्यावे. त्यानंतर या मक्याच्या दाण्यांमध्ये, प्रत्येकी १ टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिंबीर घालावी. आता यात वरून चीज किसून घालावे. सगळे जिन्नस चमच्याने मिक्स करून, चिली चीज कॉर्न खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...

 

टॅग्स :अन्नपाककृती