Lokmat Sakhi >Food > जेवताना ताटात काप असतील तर अजून भारी काय हवे? कापांचे ३ पारंपरिक प्रकार, झटपट आणि पौष्टिक

जेवताना ताटात काप असतील तर अजून भारी काय हवे? कापांचे ३ पारंपरिक प्रकार, झटपट आणि पौष्टिक

3 types of kaaps : मस्त चमचमीत कापांचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2025 17:34 IST2025-01-26T17:30:28+5:302025-01-26T17:34:37+5:30

3 types of kaaps : मस्त चमचमीत कापांचे प्रकार

3 types of kaaps | जेवताना ताटात काप असतील तर अजून भारी काय हवे? कापांचे ३ पारंपरिक प्रकार, झटपट आणि पौष्टिक

जेवताना ताटात काप असतील तर अजून भारी काय हवे? कापांचे ३ पारंपरिक प्रकार, झटपट आणि पौष्टिक

गावाला आजीकडे, मामाकडे गेल्यानंतर वेगवेगळ्या मेजवान्यांवर आपण ताव मारत असतो. (3 types of kaaps )बरेचदा साधंच जेवण तयार करूया म्हणून मग, आजी छान फोडणीचं वरण, भात आणि तोंडी लावायला काप तयार करते. हे काप फारचं चविष्ट लागतात. (3 types of kaaps )घराघरातून काप तयार करायची पद्धत वेगळी असते. सगळे जण आपापल्या आवडीच्या पद्धतीने हे काप तयार करतात. कापासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. अशाच मसाल्याने भरलेल्या कापांची रेसीपी बघूया.

बटाट्याचे काप
बटाट्याचे काप तर सगळ्यांना माहिती आहेत. कोणत्याही पद्धतीने तयार करा ते मस्तच लागतात. आपल्याला कधीकधी खुप घाई असते. वाटण वगैरे तयार करायला वेळ नसतो. अशा वेळी एकदम झटपट काप तयार करायचे असतील तर या पद्धतीने करा. (3 types of kaaps )
१. बटाट्याचे गोल गोल कापा करून घ्या. पण काप जाड ठेवा अगदी पातळ कापू नका. 
२. एका ताटलीत मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडंसं तेल घ्या. त्यात अगदी चमचाभर तांदळाचं पीठ घाला. थोडं पाणी घालून पेस्ट कालवून घ्या. पातळ करू नका. आता बटाट्याला सगळीकडून छान पेस्ट लावून घ्या. 
३. एका पॅनमध्ये तेल घ्या. शॅलोफ्राय करायला लागेल एवढं प्रमाण ठेवा.
४. पॅनवरती काप छान लावून घ्या. थोडावेळ झाकून ठेवा.
५. कुरकुरीत किंवा मऊ तुमच्या आवडीनुसार परता.

वांग्याचे काप
वांग्याचे काप अनेक पद्धतींनी तयार केले जातात. भाताशी मसालेदार काप उत्तम लागतात.
१. वांग्याचे जाडसर काप करा. त्याच्या मधोमध खाचे मारा.
२. आलं-लसुण-मिरची अशी पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये थोडे बेसन आणि तांदळाचे पीठ घाला. मीठ घाला. थोड्या पाण्यात पेस्ट कालवून घ्या.  
३. वांग्याचे कापात पेस्ट निट भरून घ्या.
४. तेलावरती छान शॅलोफ्राय करून घ्या.

सूरणाचे काप   
सुरण सगळ्यांना आवडतेच असे नाही. पण त्याचे काप खुप रूचकर असतात. तयार करायला सोपे.
१. सुरण कुकरमध्ये उकडून घ्या. त्याचे काप करून घ्या.
२. हळद, तिखट, मीठ अशी पेस्ट तयार करून कापांना लावा.
३. ताटात रवा घ्या. रव्यात थोडे तांदळाचे पीठ घ्या. कापांना दोन्ही बाजूंनी  व्यवस्थित पीठ लावून घ्या.
४. तेलावरती परतून घ्या.   

झटपट होणारे हे काप पटपट संपूनही जातात.

Web Title: 3 types of kaaps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.