Lokmat Sakhi >Food > शाळा-ऑफिसच्या डब्यातले पदार्थ राहतील गरम? डब्यात जेवण भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

शाळा-ऑफिसच्या डब्यातले पदार्थ राहतील गरम? डब्यात जेवण भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

3 Ways to Keep Food Hot in Tiffin Box : डब्यातलं जेवण अधिक काळ फ्रेश-गरम राहण्यासाठी ३ टिफिन ह्रॅक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 02:47 PM2024-02-15T14:47:41+5:302024-02-15T14:48:47+5:30

3 Ways to Keep Food Hot in Tiffin Box : डब्यातलं जेवण अधिक काळ फ्रेश-गरम राहण्यासाठी ३ टिफिन ह्रॅक्स

3 Ways to Keep Food Hot in Tiffin Box | शाळा-ऑफिसच्या डब्यातले पदार्थ राहतील गरम? डब्यात जेवण भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

शाळा-ऑफिसच्या डब्यातले पदार्थ राहतील गरम? डब्यात जेवण भरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

शाळा, ऑफिस असो किंवा लांबचा प्रवास. आपण बऱ्याचदा टिफिन कॅरी करतो. चपाती-भाजी, भात-डाळ किंवा इतर पदार्थ टिफिनमध्ये भरून घेऊन जातो. पण बऱ्याच वेळानंतर पदार्थ थंड होतो. ज्यामुळे जेवणाची चव बदलते. शिवाय थंड जेवण खाण्याची इच्छा होत नाही. थकवा आल्यावर गरमागरम जेवण मिळाले तर मजा द्विगुणित होते. पण प्रश्न असा आहे की टिफिनमध्ये अन्न गरम कसे ठेवायचे?

काही लोकं अन्न पुन्हा गरम करून खात नाही (Tiffin Hacks). शिवाय जेवण गरम करण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे गरम करणं टाळतात. पण टिफिनमध्ये जेवण गरम राहावे, यासाठी कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील? पाहूयात(3 Ways to Keep Food Hot in Tiffin Box).

इन्सुलेटेड कंटेनर

अन्न अधिक वेळ डब्यामध्ये गरम राहावे, यासाठी आपण इन्सुलेटेड टिफिन बॉक्सचा वापर करू शकता. यामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत अन्न पूर्णपणे गरम राहील. फक्त अन्न पॅक करताना, कंटेनरमध्ये गरम जेवण भरा. यामुळे अन्न जितके गरम असावे तितके गरम राहील.

‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’

उकळलेले पाणी

उकळलेलं पाणी वापरून पदार्थ गरम ठेवता येऊ शकते. यासाठी सकाळी उठल्याबरोबर एका पातेल्यात पाणी उकळेपर्यंत गरम करण्यासाठी ठेवा. नंतर स्टेनलेस स्टीलच्या डब्यात पाणी घाला आणि ते बंद करा. आपले अन्न तयार करा. अन्न तयार झाल्यानंतर डब्यातील पाणी एका भांड्यात काढा, व टिफिन स्वच्छ करा, व त्यात लगेच अन्न पॅक करा. यामुळे जेवण गरम राहील.

कपभर पोहे-५ कप पाणी, दुप्पट फुलणारे पापड करा घरीच, वाळवण्यासाठी गच्चीवरही जाण्याची गरज नाही..

हीट पॅकचा करा वापर

अन्न अधिक वेळ गरम राहावे असे वाटत असेल तर, आपण हीट पॅकचा वापर करून पाहू शकता. बाजारात दोन प्रकारचे हीट पॅक उपलब्ध आहेत, एक जे स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते आणि दुसरे जे अन्न गरम ठेवण्यासाठी वापरले जाते. याच्या वापराने अन्न अधिक वेळ गरम राहील. शिवाय ताजे - फ्रेश राहील.

Web Title: 3 Ways to Keep Food Hot in Tiffin Box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.