Join us  

कोण म्हणतं विरजणाशिवाय दही लावता येत नाही? ३ सुपर ट्रिक्स; घरीच तयार होईल विकतसारखे घट्ट दही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 1:03 PM

3 ways to set curd without starter : घरीच मलाईदार घट्ट दही लावण्याच्या ३ युनिक ट्रिक्स..

उन्हाळा सुरु झाला की आपल्या प्रत्येक घरात दही लावण्यात येते. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही शरीराला थंडावा देते. शिवाय काम करण्याची उर्जाही देते. घरात दही उपलब्ध नसेल तर, आपण दुकानातून विकतचे दही आणतो. पण विकतचे दही आणण्यापेक्षा घरात लावलेले दही खाणे केव्हाही उत्तम (Homemade Dahi). दही खाण्याचे फायदे फक्त आरोग्याला नसून, केस, त्वचा, पचन संस्था सुधारण्यात यासह हाडांसाठी फायदेशीर ठरते (Cooking Tips).

आपण वाटीभर दही नियमित खाऊ शकता. दही लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण घरात दही लावताना ते विकतसारखे घट्ट आणि गोड तयार होईलच असे नाही. दही जर घट्ट आणि विकतसारखे तयार करायचे असेल तर, या ३ पद्धतीने करून पाहा. दही परफेक्ट तयार होईल(3 ways to set curd without starter).

दही लावण्याच्या ३ पद्धती

मिरची

सध्या सोशल मिडीयावर दही लावण्याच्या अनेक पद्धती व्हायरल होतात, आणि त्यातीलच एक म्हणजे मिरचीचा वापर करून लावण्यात येणारे दही. सर्वप्रथम, कोमट दूध एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यात आपण मिरचीचे देठ किंवा एक मिरची दुधाच्या वाटीत ठेऊ शकता. त्यावर झाकण ठेवा. ५ ते ६ तासानंतर दही विरजणाशिवाय जमेल.

कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..

लिंबू

लिंबूच्या रसाचा वापर करूनही आपण दही लावू शकता. यासाठी एका वाटीत कोमट दूध घ्या. थोडे थंड झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा. त्यावर झाकण ठेवा. ९ ते १० तासानंतर दही लागले आहे की नाही हे चेक करा. खाण्यायोग्य मलाईदार आणि घट्ट दही तयार होईल.

चिंच

चिंचेचा कोळ फक्त स्वयंपाकात नसून, दही लावण्यासाठीही उपयुक्त ठरते. आपण याच्या वापराने घरात विरजणाशिवाय दही लावू शकता. यासाठी एका वाटीत कोमट दूध घ्या. त्यात चिंचेचा एक तुकडा आणि मीठ घालून मिक्स करा. त्यावर झाकण ठेवा. १० ते १२ तासानंतर दही जमले आहे की नाही, हे चेक करा. अशा पद्धतीने देखील आपण दही लावू शकता.

साबुदाणे वडे फुगतच नाही? फार तेल पितात? एक सिंपल ट्रिक, हॉटेलस्टाईल साबुदाणा वडे करण्याची सोपी कृती

दही

दही लावण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे विरजण. विरजणाचा वापर करून आपण दही लावतो. यासाठी मातीचं भांडं घ्या. त्यात कोमट दूध घाला. दूध थोडे थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा दही घालून चमच्याने मिक्स करा. त्यावर एक सुती कापड ठेवा. ७ ते ८ तासानंतर दही लागले आहे की नाही हे पाहून घ्या. अशा पद्धतीने आपण घट्टसर पारंपारिक पद्धतीने दही तयार करू शकता.

टॅग्स :किचन टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.