Join us  

तेलाचा थेंबही न वापरता झटपट होणारे ब्रेकफास्टचे ३ सोपे प्रकार, खा पौष्टिक-दिवसभर पुरेल एनर्जी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 8:18 AM

3 zero oil breakfast recipes to start your day : नाश्त्याला तेलकट पदार्थ खाणे नको वाटते? ऑइल फ्री नाश्त्याच्या ३ भन्नाट रेसिपीज...

सकाळचा नाश्ता हा दिवसांतील सर्वात महत्वपूर्ण आहार असतो. सकाळी नाश्त्याला काय खातो यावरच आपली संपूर्ण दिवसाची एनर्जी टिकून असते. शक्यतो सकाळच्यावेळी हेल्दी नाश्ता करावा असे म्हटले जाते. आपण सकाळी जो नाश्ता करतो त्या नाश्त्यातून आपल्याला दिवसभरासाठीची आवश्यक (Healthy Breakfast Recipe) ऊर्जा आणि पोषण मिळत असते. सकाळी उठल्यानंतर आपल्याला कडकडून भूक लागलेली असते आणि अशावेळी हेल्दी खाणं हा एक उत्तम पर्याय असतो. सकाळी शक्यतो चविष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असेल असाच नाश्ता करावा(less oil 5 minutes healthy breakfast recipe).

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामुळेच सध्या प्रत्येकजण हेल्दी लाइफस्टाइल निवडत आहे. हेल्दी लाइफस्टाइल निवडताना काही सवयींमध्ये (Oil free breakfast recipe in 5 minutes) बदल केले जात आहेत. जसे की सकाळी हेल्दी व तेलाचा वापर न केलेला नाश्ता खाण्यावर अधिक भर दिला जात आहे. हेल्दी किंवा बिना तेलाचा नाश्ता ही आजकाल अनेकांची पहिली पसंती बनली आहे. आपण तेलाचा वापर (What are the 3 breakfast without oil that can be cooked on daily basis) न करता चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता अगदी कमी साहित्यात व कमी वेळात तयार करु शकतो. असा ऑइल फ्री नाश्ता करायला जास्त वेळ लागत नाही आणि तासंतास किचनमध्ये उभे राहावे लागत नाही. झिरो ऑइल ब्रेकफास्टसाठी नाश्त्याचे ३ उत्तम ऑप्शन पाहूयात(Try these easy, oil-free breakfast recipes st home). 

झिरो ऑइल ब्रेकफास्टसाठी नाश्त्याचे ३ पदार्थ कोणते ? 

१. ओट्स उपमा :- 

तेलाचा वापर न केलेल्या ब्रेकफास्टमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य तर सुधारतेच, पण त्याचबरोबर ते लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही ओट्सचा उपमा बनवून खाऊ शकता. यासाठी गरम पाण्यात ओट्स घालून त्यात कांदा आणि टोमॅटोसह तुमच्या आवडत्या भाज्या घालाव्यात. यानंतर ५ ते १० मिनिटे शिजल्यावर त्यात तिखट, हळद आणि मीठ इ. घालून अजून थोडा वेळ शिजवा. तेलाशिवाय बनवलेला हा ओट्स उपमा तुम्हाला नक्कीच आवडेल. 

पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...

२. पनीर कॉर्न सॅलॅड :- 

जर तुम्हाला नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट काहीतरी खायचे असेल तर पनीर कॉर्न सॅलॅड हा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला एक नॉन-स्टिक पॅन घ्यावा लागेल आणि त्यात पनीरचे तुकडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कॉर्न घालून मिक्स करा. आपण आपल्या आवडीनुसार मसाले आणि मीठ घालू शकता. शेवटी, चाट मसाला, काळी मिरी पूड आणि लिंबाचा रस घालून खाण्यासाठी सर्व्ह करावे. 

उपमा करताना गुठळ्या होऊ नये म्हणून लक्षात ठेवा ५ टिप्स, उपमा होईल चवीला परफेक्ट आणि मऊसूत... 

३. बटाट्याचा पराठा :- 

ही पोळी तेलाशिवाय बनवली जाते. सगळ्यात आधी बटाटा उकडवून घ्यावा आणि नंतर तो बारीक करून त्यात सर्व मसाले घालावेत. यानंतर पीठ मिक्स करून, पीठ मळून घ्या आणि त्यापासून बनवलेल्या पोळ्या नॉन-स्टिक तव्यावर एक-एक करून बेक करा. विशेष म्हणजे या पोळ्या खाण्यासाठी तुम्हाला भाजीचीही गरज नाही. दही किंवा चटणी सोबतही याची चव अप्रतिम लागते.

टॅग्स :अन्नपाककृती