Join us  

New Year Special : ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी जेवणानंतर घ्यायला करा मस्त केशर-बदाम दूध, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 9:48 AM

31st Dec Celebration Food Recipe Kesar Badam Milk : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले दूध करण्याची सोपी पद्धत

ठळक मुद्देथंडीच्या दिवसांत ऊर्जा मिळण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होईल.  रात्री जागरण केल्यावर प्यायला गरमागरम पर्याय...

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. वर्ष सरताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्या जवळची मंडळी आपल्यासोबत असावीत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. मग नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाहेर कुठे फिरायला जाण्याचे किंवा एकमेकांसोबत कोणाच्या घरी गप्पा-गोष्टींसाठी भेटण्याचे प्लॅन होतात. आपल्या घरी पाहुणे येणार असतील की खायला-प्यायला काय करायचं असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो (31st Dec Celebration Food Recipe Kesar Badam Milk). . 

थंडीचे दिवस असल्याने आपल्याला गरमागरम काहीतरी हवं असतं. जेवणाचा बेत झाला तरी या दिवशी रात्री आपण जागरण करतो त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. अशावेळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले केशर-बदाम दूध हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. पाहूया हे दूध कसे करायचे ..

(Image : Google)

साहित्य - 

१. बदाम - १० ते १५ 

२. खारीक पूड - २ चमचे 

३. दूध - १ ते १.५ लीटर 

४. साखर - १ ते २ चमचे

५. बदाम काप - पाव वाटी 

६. केशर - ८ ते १० काड्या

कृती -

१. बदाम ७ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याची साले काढून घ्या.

२. मिक्सरच्या भांड्यात बदाम, खारीक पावडर आणि अर्धा कप दूध घालून त्याची पेस्ट करुन घ्या.

३. पातेल्यात दूध उकळा, घट्टसर होईपर्यंत चमच्याने हलवून थोडे आटवा.

४. त्यानंतर यामध्ये केशर, साखर आणि बदाम काप घाला.

५. शेवटी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घालून पुन्हा थोडे उकळू द्या.

६. हे गरमागरम दूध प्यायल्याने घशाला आराम मिळेल आणि थंडीच्या दिवसांत ऊर्जा मिळण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होईल.  

टॅग्स :अन्नपाककृतीनववर्षकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.