Join us  

भाज्या झटपट चिरुन होण्यासाठी ४ सोप्या टिप्स, भाजी चिरण्याचे वेळखाऊ काम होईल चटकन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2023 11:55 AM

4 Chopping Hacks That Can Make Your Life Easier : भाज्या चिरताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरुन घाईच्या वेळी भाज्या चटकन चिरुन होतील.

स्वयंपाक करायला सुरुवात करताना आपण सर्वप्रथम जे जिन्नस लागतात ते कापून किंवा बारीक चिरुन घेतो. स्वयंपाक बनविण्यासाठी आपण लागणाऱ्या भाज्या आधी बारीक चिरून घेतो. दररोज लागणाऱ्या भाज्या बनवताना त्या कापण्यात किंवा चिरण्यात आपला बराच वेळ खर्ची होतो. काहीवेळा आपण दुसऱ्या दिवशी करायच्या भाज्या आदल्या रात्रीच चिरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. जेणेकरुन दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना आपला वेळ वाया जाणार नाही. आपल्यापैकी बऱ्याच महिलांना भाज्या चिरणे म्हणजे खूपच कंटाळवाणे काम वाटते. भाज्या चिरणे हे खूपच कंटाळवाणे काम कसे झटपट उरकता येईल यासाठी अनेक महिला बऱ्याच युक्त्या शोधत असतात. 

आपण भाज्या चिरताना डिश किंवा बहुतेकवेळा चॉपिंग बोर्डचा वापर करतो. परंतु आपल्याला अनुभव आला असेल की भाज्या चिरताना काहीवेळा हा चॊपिंग बोर्ड निसटून आपल्या हाताला इजा होते. तसेच काही आकाराने मोठे असलेले फळ किंवा भाज्या कप्तान आपल्या हातून चाकू निसटून बोट कापले जाते. अशावेळी नेमकं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणींपुढे असतो. त्यामुळे भाज्या कापताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरुन घाईच्या वेळी भाज्या चटकन चिरुन होतील(4 Chopping Hacks That Can Make Your Life Easier).

झटपट भाजी चिरून घेण्यासाठी या टिप्सचा नक्की वापर करा... 

१. मऊ नॅपकिन किंवा टॉवेलचा वापर करावा :- भाज्या चिरताना आपण बहुतेकवेळा मोठ्या डिशचा किंवा चॉपिंग बोर्डचा वापर करतो. काहीवेळा भाज्या कापताना डिश किंवा चॉपिंग बोर्ड जागेवरुन सरकण्याची शक्यता असते. भाज्या कापताना डिश किंवा चॉपिंग बोर्ड अचानक सरकल्याने आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, डिश किंवा चॉपिंग बोर्ड जागेवरुन सरकू नये किंवा जागचा हलू नये म्हणून त्या खाली मऊ टॉवेल किंवा छोटे नॅपकिन  अंथरावे. असे केल्याने डिश किंवा चॉपिंग बोर्ड एका जागेवर जमिनीला चिकटून राहील. यामुळे डिश किंवा चॉपिंग बोर्ड एकाच जागेवर स्थिर राहून जागचे हलणार नाही. असे केल्याने भाजी चिरणे आपल्याला सोपे जाईल तसेच चटकन भाजी चिरुन होईल. 

२. भाज्या संपूर्ण सुकवून घ्याव्यात :- भाज्या चिरण्यापूर्वी आपण त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतो. या भाज्या धुतल्यानंतर आपण त्यांना संपूर्णपणे सुकू न देता ओल्याच असताना चिरायला घेतो. काहीवेळा आपल्याकडे धुतलेल्या भाज्या संपूर्णपणे सुकवून घेण्याइतका वेळ नसतो. परंतु भाज्या धुतल्यावर त्या सुकल्यानंतरच चिरायला घेणे गरजेचे आहे. भाज्यांमध्ये उरलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे या भाज्या चिरताना चॉपिंग बोर्डवरुन सरकण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही भाज्या अशा असतात की ज्या संपूर्ण सुकल्याशिवाय बनवायला घेतल्या तर त्या चांगल्या बनत नाहीत. उदाहरणार्थ :- भेंडी धुतल्यानंतर ती तशीच ओली असताना त्याची भाजी केल्यास भेंडी चिकचिकीत होते. म्हणून भेंडी धुतल्यानंतर ती स्वच्छ सुकू द्यावी आणि नंतरच कापावी. 

सकाळी डबे - ऑफिसची गडबड, स्वयंपाक करताना घाई होते? ७ टिप्स, स्वयंपाक होईल सुपरफास्ट...

३. मोठ्या आकाराच्या भाज्या कापताना काळजी घ्यावी :- काही फळे व भाज्या हे आकाराने खूपच मोठ्या किंवा लांब असतात. त्यामुळे त्या कापताना काहीवेळा सूरी हातांतून निसटते. यामुळे इजा होण्याची शक्यता असते. गाजर, दुधी, भोपळा यांसारखी आकारमानाने मोठ्या व लांब असणाऱ्यां फळभाज्यांना कापताना आधी त्यांचे छोट्या छोट्या आकारात लहान तुकडे करुन घ्यावेत त्यानंतरच या भाज्या कापाव्यात. या आकाराने मोठ्या असणाऱ्या फळभाज्यांचे असे लहान तुकडे करुन मग कापल्याने त्या व्यवस्थित कापल्या जातात तसेच सगळे तुकडे एकाच शेपमध्ये कापणे सोपे जाते. 

४. भाज्या कापण्याची सूरी धारदार असावी :- जर आपल्याला खूप कमी वेळात अगदी पटकन आणि परफेक्ट शेपमध्ये भाज्या कापायच्या असतील तर सूरी किंवा चाकू धारदार असायला हवे. जेव्हा भाज्या कापण्याच्या चाकूला धार असते तेव्हा भाज्या एकाचवेळी एका परफेक्ट शेपमध्ये कापून होतात. चाकूला योग्य धार नसली तर भाज्या किंवा फळ कापण्यासाठी आपल्याला भरपूर जोर लावावा लागतो यामुळे भाज्यांचा आकार कापताना बिघडू शकतो. तसेच हे आपल्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते. चाकूवर जोर लावल्यामुळे चाकू हातांतून घसरु शकतो. यामुळे तुम्हाला गंभीर दुखापत देखील होऊ शकते.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स