Lokmat Sakhi >Food > Diwali : बाजारात बनावट काजूंचीही विक्री, कॅन्सरचा धोका- ३ गोष्टींवरुन ओळखा काजू चांगले आहेत की भेसळ

Diwali : बाजारात बनावट काजूंचीही विक्री, कॅन्सरचा धोका- ३ गोष्टींवरुन ओळखा काजू चांगले आहेत की भेसळ

Easy Tips To Check Quality Of Cashew At Home : बनावट काजू बनवण्यासाठी वापरण्यात आलेले कृत्रिम रसायनं आणि रंग कॅन्सरचं कारण ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:21 PM2024-10-23T13:21:24+5:302024-10-23T15:01:48+5:30

Easy Tips To Check Quality Of Cashew At Home : बनावट काजू बनवण्यासाठी वापरण्यात आलेले कृत्रिम रसायनं आणि रंग कॅन्सरचं कारण ठरू शकतात.

4 Easy Tips To Check Quality Of Cashew At Home During Diwali How to Check Purity Of Cashew | Diwali : बाजारात बनावट काजूंचीही विक्री, कॅन्सरचा धोका- ३ गोष्टींवरुन ओळखा काजू चांगले आहेत की भेसळ

Diwali : बाजारात बनावट काजूंचीही विक्री, कॅन्सरचा धोका- ३ गोष्टींवरुन ओळखा काजू चांगले आहेत की भेसळ

दिवाळीचा (Diwali 2024)  सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.  भारतात कोणताही सण असला तरी ड्रायफ्रुट्स किंवा गोड पदार्थांशिवाय अपूर्ण असतो. दिवाळीला मिठाई आणि गिफ्ट देण्याची परंपरा आहे. यादिवशी लोक ड्राय फ्रुट्स, नट्सचे डब्बे  लोकांना गिफ्टच्या स्वरूपात देतात. फेस्टिव्ह सिजनमध्ये डिमांड पूर्ण करण्यासाठी विक्रेते बनावट आणि जुने काजू मोठ्या प्रमाणात विकतात. (4 Easy Tips To Check Quality Of Cashew At Home During Diwali How to Check  Purity Of Cashew)

काजूला एक हेल्दी स्नॅक्स म्हटले जाते. या दिवसांत बाजारात नकली काजूसुद्धा मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.  ज्यामुळे चांगले काजू आणि नकली काजू यात फरक ओळखणं कठीण होतं. बनावट आणि जुने काजू खाल्ल्यानं पचनाच्या समस्या, एलर्जी, फूड पॉयजनिंग आणि इम्युनिटी कमकुवत होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ आणि डायटिशियन शिखा अग्रवा शर्मा यांनी  नकली आणि असली काजूमध्ये फरक कसा ओळखायचा याबाबत सांगितले आहे. (How to Check  Purity Of Cashew)

भेसळयुक्त काजू खाल्ल्यानं शरीरात काय परिणाम होतो?

बनावट काजूमध्ये वापरली जाणारी रसायनं गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये जळजळ निर्माण करतात ज्यामुळे उटली, जुलाब यांसारखे त्रास होतात.  असे काजू खाल्ल्यानं पोटाचे विकार उद्भवतात आणि फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. त्वचेवर चट्टे, खाज अशा समस्या उद्भवतात.

नकली काजूमध्ये वापरले जाणारे रसायनं एलर्जिक रिएक्शन देऊ शकतात. ज्यामुळे त्वचेवर चट्टे आणि खाज येऊ शकते.  लिव्हर आणि किडनी डॅमेज होण्याचा धोका असतो बनावट काजूमध्ये हानिकारक रसायनं असतात. शरीरात विषारी पदार्थांचा संचय होऊ शकतो. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीचं नुकसान होऊ शकतं. 

आठवड्याच्या 'या' वाराला तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक; डॉक्टर सांगतात अचानक अ‍ॅटॅक येण्याचं कारण

बनावट काजू बनवण्यासाठी वापरण्यात आलेले कृत्रिम रसायनं आणि रंग कॅन्सरचं कारण ठरू शकतात. याच्या सेवनानं हॉर्मेनल असंतुलन होते. इतकंच नाही तर इम्यून सिस्टिम कमकुवत होते. ज्यामुळे शरीराला आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. 

काजूची शुद्धता कशी तपासावी? (How To Check Purity Of Cashew)

काजूचा रंग पांढरा असतो. तर बनावट काजूंचा रंग हलका पिवळा असतो.  या रंगातील फरक माहित असावा लागतो. म्हणून काजू विकत घेतात त्याच्या रंगावर जरूर लक्ष द्यावे. 

कमी वयात केसांवर टक्कल पडलंय? 'या' २ प्रकारचे तेल मिसळून लावा, भराभर वाढतील केस

काजूचा आकार कसा आहे ते सुद्धा महत्वाचे असते. काजू जवळपास १ इंच लांब आणि थोडे मोठे असतात. जर साईजमध्ये फरक दिसला तर समजून जा की काजू नकली आहेत. काजूचा आकार आणि रंग पाहून  काजूची शुद्धता तपासता येते.

अस्सल काजू खाताना दातांना चिकटत नाहीत या ऊलट बनावट काजू खाताना दातांना चिकटतात.  नकली काजू पचायला खूपच कठीण असतात. काजूची चव पाहूनही तुम्ही काजूची चव सहज ओळखू शकता. 

Web Title: 4 Easy Tips To Check Quality Of Cashew At Home During Diwali How to Check Purity Of Cashew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.