Join us  

पदार्थात मीठ जास्त, तिखटाचं प्रमाण चुकलं तर? ४ टिप्स, बिघडलेला पदार्थ चटकन होईल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 1:12 PM

4 Easy tips to fix cooking Mistakes : बिघडलेला पदार्थ रिपेअर करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स

कधी डोक्यात विचार असल्याने किंवा कधी आपण खूप घाईत असलो की आपला स्वयंपाकाचा अंदाज चुकतो. एखादवेळी पदार्थात मीठ जास्त होते तर कधी तिखट. मीठ किंवा तिखट कमी झाले तर ते वरुन घालून वाढवता येऊ शकते. पण जास्त झाले तर मात्र पदार्थ बिघडतो आणि जास्त झालेली गोष्ट कमी करण्यासाठी काय करावे ते आपल्याला समजत नाही. त्यातही घरी पाहुणे येणार असतील की मग तर आपली पुरती फजिती होऊन जाते. पण बिघडलेला पदार्थ रिपेअर करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स आपल्याला माहित असतील तर त्याचा चांगलाच फायदा होतो. आज आपण अशाच काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत. ज्यामुळे पदार्थ बिघडला तरी तो खराब न लागता किंवा वाया न जाता आपण अगदी सहज खाऊ शकतो. पाहूयात या अगदी सोप्या पण स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय उपयुक्त असणाऱ्या टिप्स कोणत्या (4 Easy tips to fix cooking Mistakes)...

१. पदार्थ जास्त गोड झाला

अशावेळी पदार्थाची गोडी कमी करण्यासाठी त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा. यामुळे गोडपणा थोडा कमी होण्यास मदत होऊ शकते. 

२. खारट झाल्यास

मीठ जास्त पडणे ही तक्रार अनेकदा उद्भवते. मीठ हा असा घटक आहे की तो एकदा जास्त झाला की काही केल्या कमी करता येत नाही. अशावेळी पदार्थामध्ये बटाट्याचे तुकडे घातल्यास खारटपणा कमी होण्यास मदत होते.

(Image : Google)

३. भाजी मसालेदार झाल्यास

भाजीत मसाला किंवा तिखट जास्त झाल्यास ती खाणे अवघड होऊन जाते. लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती तर तिखट अजिबात खाऊ शकत नाहीत. अशावेळी भाजीत क्रिम किंवा योगर्ट घातल्यास तिखटपणा कमी होण्यास मदत होते.

४. आंबट झाल्यास

एखादा पदार्थ आंबट झाल्यास त्यामध्ये साखर किंवा मध घालावा. यामुळे पदार्थाचा आंबटपणा कमी होतो. दही, टोमॅटो, लिंबू, चिंच यांसारखे जिन्नस घातल्याने पदार्थ पटकन आंबट होण्याची शक्यता असते.   

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.