किचनमधील पदार्थ अधिक काळ ठेवल्यानंतर ते खराब होतात. त्यांना कीड, अळ्या लागतात. गहू, तांदूळ, ज्वारी, साखर याचप्रमाणे साखरेला देखील कीड लागतात. रवा नीट साठवून न ठेवल्यास त्यात लवकर अळ्या होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे कीटकांपासून मुक्त होणे. रवा खूप बारीक असतो. त्यामधून किडे, अळ्या काढणे खूप कठीण जाते.
काही जण रव्याला कीड लागल्यानंतर फेकून देतात. पण रव्याला फेकून देऊ नका. रव्याला किडे, अळ्या लागू नये असे वाटत असेल तर, या काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे रव्यामधील कीड सहज दूर करता येईल, व पुन्हा रव्याला कीड लागणार नाही(4 Easy Tips To Keep Semolina Insect Free).
रव्यामधून किडे काढण्यासाठी उपाय
सूर्यप्रकाश
कीटक कडक उन्हात राहत नाहीत, ते उष्णतेपासून पळून जातात. कीटकांपासून धान्य मुक्त करण्यासाठी ही जुनी पद्धत आहे. रव्यासह इतर धान्य वेळोवेळी सूर्यप्रकाशाला दाखवत राहा, ज्यामुळे कीटकांचा धोका कमी होतो.
कडुनिंबाची पाने
कडूनिंबाच्या पानांमधील औषधी गुणधर्म प्रत्येकाला माहित आहे. या पानांना कीटकांचा शत्रू देखील म्हटले जाते. रव्यामधून कीटक पळून जावे असे वाटत असेल तर, रव्याच्या डब्यात ५ ते ६ कडूनिंबाची कोरडी पाने ठेवा. या उपायामुळे डब्याच्या आजूबाजूला किडे फिरकणार देखील नाही.
कापूर
कापूरचा गंध खूप तीव्र असतो, ज्यामुळे कीटक जवळपास फिरकत नाही. यासाठी रवा पहिले चाळून घ्या. व रवा एका डब्यात साठवून ठेवा. डब्याच्या कोपऱ्यात कापूर ठेवा. याउपायामुळे रव्याजवळ कीटक फिरकणार नाही. व रव्यामधील कीटक देखील पळून जातील.
मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही..
लवंग
धान्यांमधून कीटक काढण्यासाठी लवंग मदत करेल. यासाठी रव्याच्या डब्यात लवंग ठेवा. यामुळे रव्याच्या डब्याजवळ कीटक फिरकणार नाही. घरात लवंग जर नसेल तर, त्याजागी आपण दालचिनी देखील वापरू शकता.