Lokmat Sakhi >Food > इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास...

इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास...

4 Easy Tips for Soft and Spongy Idli : इडल्या छान टम्म फुगाव्यात आणि स्पॉंजी व्हाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2023 12:11 PM2023-08-06T12:11:40+5:302023-08-06T12:27:09+5:30

4 Easy Tips for Soft and Spongy Idli : इडल्या छान टम्म फुगाव्यात आणि स्पॉंजी व्हाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स

4 Easy Tips to Make Idlis Super Soft and Fluffy; Hot idli will be ready... | इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास...

इडली मस्त मऊ-लुसलुशीत होण्यासाठी ४ सोपे उपाय; गरमागरम इडलीचा बेत होईल झक्कास...

इडली हा कोणी पाहुणे येणार असतील किंवा लहान मुलांचा वाढदिवस नाहीतर आणखी काही असेल तर झटपट होणारा आणि पौष्टीक असा पर्याय असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही इडली पोटभरीचीही असल्याने कुठे गावाला जायचे असेल तरी आपण सोबत घेऊ शकतो. पण ही इडली छान मऊ-लुसलुशीत झाली तरच ठिक. नाहीतर ती घशाशी येते आणि कोरडी कोरडी लागते. भगरट इडली खायला अजिबात नको वाटते आणि मग आपला सगळा मूडच जातो. अनेकदा आपण इडलीचे पीठ घरी भिजवतो किंवा काहीवेळा घाई असेल तर बाजारातून तयार पीठ आणतो. हे पीठ घरी करताना त्यातील डाळ-तांदळाचे प्रमाण योग्य झाले तर ठिक नाहीतर सगळे गणित बिनसते आणि इडल्या अजिबातच फुगत नाहीत. पण या इडल्या छान टम्म फुगाव्यात आणि स्पॉंजी व्हाव्यात यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत (4 Easy Tips for Soft and Spongy Idli). 

१. इनो किंवा सोडा

इडलीचं पीठ आपण आधीच आंबवलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याची आवश्यकता नसते. असे असले तरी हे पीठ नेहमी चांगले आंबतेच असे नाही. काही वेळा वातावरणामुळे हे पीठ नीट आंबत नाही आणि मग इडल्या न फुगता चपट्या होण्याची शक्यता असते. अशावेळी थोडंसं इनो किंवा खायचा सोडा या पीठात घातलेला केव्हाही चांगला. त्यामुळे इडल्या मस्त फुलतात. 

२. पोहे आणि मेथ्या 

इडलीचं पीठ भिजवताना आपण त्यामध्ये डाळ आणि तांदळाचे ठरल्याप्रमाणे घेतो. मात्र यामध्ये भिजवतानाच थोडे पोहे आणि मेथ्या घालाव्यात पोह्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होते आणि मेथ्यांमुळे हे पीठ लवकर आंबते. त्यामुळे मूठभर पोहे आणि थोडेसे मेथीचे दाणे इडलीचं पीठ भिजवताना आवर्जून घालायला हवेत. 

३. डाळ आणि तांदळाचे प्रमाण

आपण साधारणपणे जितके तांदूळ घेतो त्याच्या एक तृतियांश उडदाची डाळ घेतो. हे प्रमाण योग्य ठेवल्यास इडली छान फुगायला मदत होते. तसेच उडदाच्या डाळीसोबतच थोडी मूगाची डाळ घेतली तर हे पीठ आणखी छान हलके होते आणि इडल्या मस्त फुगतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. दही 

दही हे कोणतीही गोष्ट आंबवण्यासाठी अतिशय चांगला पर्याय असतो. दही स्वत:च आंबलेले असल्याने इडलीच्या पीठात थोडेसे दही घातल्यास हे पीठ जास्त चांगले आंबण्यास मदत होते. 

Web Title: 4 Easy Tips to Make Idlis Super Soft and Fluffy; Hot idli will be ready...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.