Join us  

कढी फुटू नये, पांचट होवू नये म्हणून लक्षात ४ गोष्टी, कढी होईल परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 12:11 PM

4 Easy Tips To Prevent Kadhi From Splitting : कढी बनवताना काहीवेळा कढी फुटते आणि खराब होते, अशावेळी काय करावे?

आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत दह्याला फार महत्व दिले जाते. दह्यात कमालीचा थंडावा असून, पोट स्वच्छ करण्याची क्षमता त्यात असते. दह्याचे हे गुणधर्म असल्यामुळे भारताच्या उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत प्रत्येक थाळीत दह्याने बनवलेला एक तरी पदार्थ असतोच. दह्यापासून आपण कढी, कढी पकोडा, दह्याचे रायत असे अनेक पदार्थ रोजच्या जेवणात करतो. काहीवेळा आपल्याला डाळ किंवा वरण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशा परिस्थितीत चपाती किंवा भातासोबत काहीतरी वेगळं खावंसं वाटत. अशावेळी फ्रिजमध्ये दही असले आणि ते जरासे चवीने आंबट असले की मग काय घुसळले ताक आणि दिली चटकन फोडणी की खमंग कढी खाण्यासाठी तयार आहे. 

बऱ्याच भारतीय घरांमध्ये ताकाची कढी हा अतिशय आवडीचा प्रकार असतो. उन्हाळा असो वा हिवाळा गरमागरम ताकाची कढी पिणे म्हणजे मनाला आणि पोटाला एक वेगळाच आनंद मिळतो. ताकाची कढी घरच्या घरी झटपट बनवली जाते. परंतु ही कढी बनवताना खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर ऐनवेळी कढी फुटून तिची चव बिघडते व सगळा हिरमोड होतो. कढी बनवताना काहीवेळा कढी फुटते आणि खराब होते, या समस्येचा अनुभव प्रत्येक गृहिणीला कधीनाकधी आलाच असेल. कढी फुटू नये म्हणून एक सोपी खास ट्रिक लक्षात ठेवू(4 Easy Tips To Prevent Kadhi From Splitting).

कढी फुटू नये म्हणून नक्की काय करायचं ? कढी बनवताना बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की कधी फाटते किंवा काढीतील पाणी आणि दही वेगवेगळं होत. खरंतर कढीच्या नावातच एक खासियत दडली आहे. ती म्हणजे कढी जितकी आपण कढवतो, उकळवतो तितकीच ती खमंग लागते. परंतु कढी जेवढी जास्त उकळवली जाते तेवढी ती फाटते. कढी फाटू नये म्हणून काय करायचे ते पाहूयात. 

१. कढीला फोडणी दिल्यानंतर कढी व्यवस्थित ढवळून घ्यावी. सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर कढीला मंद आचेवर व्यवस्थित उकळवून घ्यावे. कढी उकळताना गॅस मंद आचेवर ठेवावा अन्यथा कढी फाटू शकते.

अस्सल गावरान झणझणीत झुणका, महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी, करायला सोपी खायला चमचमीत...

२. कढी फाटण्याच मुख्य कारण मीठ असत. जेव्हा आपली कढी पूर्णपणे बनून तयार होते तेव्हाच सगळ्यात शेवटी कढीमध्ये मीठ घालावे. सर्वप्रथम कढी मंद आचेवर व्यवस्थित उकळवून घ्यावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे मोजून १५ सेकंद चमच्याने कढी हलकेच ढवळून घ्यावी त त्यानंतर गॅस बंद करावा. यामुळे कढी न फुटता चविष्ट होते. कढी बनवत असताना त्यात सुरुवातीला फोडणीमध्ये मीठ घालू नये. सर्वात शेवटी कढीमध्ये मीठ घातल्याने शक्यतो कढी फुटत नाही. 

३. कढी बनवत असताना कढीला थोड्या थोड्या वेळाने चमच्याने हलकेच ढवळून घ्यावे यामुळे कढी न फुटता खमंग होते. 

४. कढी बनवत असताना आपण बेसनाचा वापर करतो. ताकात किंवा दह्यात बेसन मिसळून त्याचे एकजीव मिश्रण तयार करतो. काहीजण फोडणीमध्ये ताक किंवा दही घातल्यानंतर त्यात बेसन घालतात असे केल्याने कढी फुटते. त्यामुळे कढी फुटू नये यासाठी एका बाऊलमध्ये ताक किंवा दही घेऊन त्यात बेसन घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे आणि मगच या मिश्रणाला फोडणी द्यावी. चुकूनही फोडणीमध्ये ताक घालत्यावर बेसन घालू नये यामुळे कढी फुटते.

सकाळी डबे - ऑफिसची गडबड, स्वयंपाक करताना घाई होते? ७ टिप्स, स्वयंपाक होईल सुपरफास्ट...

पारंपरिक ताकाची कढी कशी बनवायची याची सोपी रेसिपी:- 

 

टॅग्स :अन्नपाककृती