स्वयंपाक करताना उकडलेल्या बटाट्यांची ( Boil potato) गरज सारखी पडते. पण बटाटे उकडताना कधी ते जास्तच शिजतात तर कधी कच्चेच राहातात. जास्त शिजलेल्या बटाट्यांमुळे पदार्थ बिघडतो तर कच्चे राहिलेले बटाटे पुन्हा शिजवताना अडचणी येतात. बटाटा योग्य शिजला तरच भाजी किंवा बटाटे घातलेले पदार्थ नीट होतात. कुकरमध्ये, बाहेर कढईत, मायक्रोवेव्हमध्ये बटाटे शिजवण्याच्या सोप्या युक्ता आहेत. त्या वापरल्या तर बटाटे (boil potato perfectly) परफेक्टच शिजतात!
Image: Google
बटाटे कुकरमध्ये उकडताना
बटाटे कुकरमध्ये उकडताना आधी ते स्वच्छ धुवून घ्यावेत. कुकरमध्ये पाणी घालावं. बटाटे बुडतील इतकं पाणी घालावं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी घालू नये. कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवर एक शिट्टी काढावी. नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवावा. 5-6 मिनिटांनी गॅस बंद करावा. कुकरमधली वाफ पूर्ण जिरु द्यावी. नंतर कुकरमधून बटाटे काढून घ्यावेत.
Image: Google
बटाटे मायक्रोवेव्हमध्ये उकडताना
1. बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. काट्याच्या चमच्याने बटाट्यांवर 6 ते 7 टोचे मारावेत. बटाटे एका मायक्रोवेव्हच्या प्लेटमध्ये ठेवावे. ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये अडीच मिनिटं ठेवावी. बटाटे जास्त नरम हवे असतील तर पूर्ण 3 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे.
2. पाणी घालूनही बटाटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवता येतात. त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवूण घ्यावेत. फोर्कच्या मदतीनं बटाट्यांना टोचे मारुन घ्यावेत. मायक्रोवेव सेफ बाउलमध्ये दीड कप पाणी घालावं. त्यात बटाटे ठेवून मायक्रोवेव्हमध्ये 8 मिनिटांचा टाइम सेट करुन बटाटे उकडायला ठेवावेत. 8 मिनिटानंतर उकडलेले बटाटे बाहेर काढावेत.
Image: Google
बटाटे कढईत उकडताना
कढई अर्धी भरेल इतकं पाणी भरुन कढई मोठ्या आचेवर ठेवावी. पाणी उकळल्यावर गॅसची आच मध्यम करावी. बटाट्याची सालं काढून घ्यावी. बटाटे धुवून पाण्यात उकडायला ठेवावेत. कढईवर झाकण न ठेवता बटाटे 15-20 मिनिटं उकडावेत. एवढ्या वेळात या पध्दतीनं बटाटे शिजवल्यास ते नीट शिजतात.