Join us  

एक्सपायरी डेट उलटून गेली तरी खाता येतात 4 पदार्थ? अभ्यास सांगतो, काय खावे आणि काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 2:39 PM

Food That Can Eat After Expiry date: एक्सपायरी डेट झाली की एखादा पदार्थ अजिबात खायचा नसतो, हे आपण ऐकलेलं असतं. पण बघा याविषयीचा अभ्यास मात्र काही वेगळंच सांगतो आहे.

ठळक मुद्देअभ्यासकांच्या मते काही पदार्थ असे असतात, जे एक्सपायरी झाल्यानंतरही खाता येतात. कोणते ते नेमके पदार्थ, त्याविषयीच ही माहिती.

दुकानात गेल्यावर कोणताही पॅक असलेला खाद्यपदार्थ आपण जेव्हा विकत घेताे, तेव्हा त्याच्यावरची एक्सपायरी डेट काय आहे, हे आपण आवर्जून तपासून पाहतो. एवढंच काय औषधी विकत घेतानाही आपण पॅकींग डेट (manufacturing date) आणि एक्सपायरी डेट (expiry date) याची आवर्जून पाहणी करूनच घेताे. घेतलेला पदार्थ एक्सपायरी डेटच्या आधी संपविण्याचा आपला प्रयत्न असतो. नाहीच संपला तर शेवटी आपण तो नाईलाजाने टाकून देतो. पण Themirror यांच्या रिपोर्टनुसार अभ्यासकांच्या मते काही पदार्थ असे असतात, जे एक्सपायरी झाल्यानंतरही खाता येतात. कोणते ते नेमके पदार्थ, त्याविषयीच ही माहिती.

 

कोणते पदार्थ एक्सपायरी डेटनंतरही चालू शकतात१. दूध (milk)अभ्यासकांच्या मते पिशव्यांमध्ये घेतले जाणारे पॅक दूध जर एकदम थंड वातावरणात ठेवलेले असेल तर एक्सपायरी तारखेनंतरही काही दिवस ते वापरता येते. पण त्यासाठी दुधामध्ये फॅट किती प्रमाणात आहेत, हे एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे. ज्या दुधात अजिबातच फॅट नसतात, असे प्रोसेस्ड दूध एक्सपायरी तारखेनंतर ७ ते ८ दिवसही चालू शकते. तर फुल फॅट दूध एक्सपायरी तारखेनंतर ४ ते ५ दिवस चालू शकते. पण त्यासाठी ते फ्रिजमध्ये कमी तापमानावर ठेवलेले असावे.

 

२. ब्रेड (bread)ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील आहारतज्ज्ञ मेगन वोंग यांच्या मते ब्रेड त्याच्या एक्सपायरी तारखेच्या नंतर ४ ते ५ दिवसांनी वापरला तरी चालू शकतो. पण यासाठी ब्रेड उष्ण तापमानात नसावा. सामान्य रुम टेम्परेचर किंवा थंड ठिकाणी तसेच कोरड्या जागेवर ठेवलेला असावा. ब्रेड जर फ्रिजमध्ये ठेवत असाला तर तो महिनाभरही टिकू शकतो, असाही दावा त्यांनी केला आहे. पण यासाठी वारंवार ब्रेड तपासून पहावा. त्यावर पांढरट, निळे, हिरवे फंगस दिसू लागले तर असा ब्रेड मात्र अजिबात खाऊ नये, असे त्यांनी सांगितले. 

 

३. पास्ता (pasta)ड्राय किंवा कोरडा पास्ता त्याच्या एक्सपायरी तारखेनंतर वर्षभराने खाल्ला तरी चालतो, असं या अभ्यासकांचं मत आहे. तसंच जर पास्ता करून ठेवला असेल आणि तो व्यवस्थित पॅक करून रेफ्रिजरेट करून ठेवला तर महिनाभरही चालू शकतो.

४. पनीर (paneer)कॅलिफोर्निया येथील आहारतज्ज्ञ सोफिया नॉर्टन यांच्यामते पनीर तुम्ही कित्येक दिवस खाऊ शकता. फक्त त्यासाठी ते पुर्णपणे रेफ्रिजरेट ठेवलेलं असावं. जर पनीरवर निळं, हिरवं फंगस दिसलं तर तेवढा पार्ट काढून टाका. उर्वरित स्वच्छ पनीर खाल्ल्यास काही हरकत नाही. फक्त खाण्यापुर्वी त्याचा वास आणि चव बदललेली आहे का, हे आधी तपासून पहा, असं नॉर्टन यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :अन्नआरोग्य