भारतीय थाळी चपाती, भाजी, भात, आमटी-वरणाशिवाय अपूर्ण आहे. शिवाय जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील अनेक पदार्थ असतात. मात्र, चपातीशिवाय थाळी अपूर्ण आहे. भारतातील प्रत्येक कोपऱ्यात विविध प्रकारची चपाती केली जाते. काही लोकं चपातीला पोळी, रोटी म्हणतात. काही लोकं चपातीवर तूप लावतात, तर काही जण चपातीवर तेल लावून शेकतात. बहुतांश घरात चपाती गव्हाच्या पिठाची तयार करण्यात येते.
मात्र, काही फिटनेस फ्रिक लोकं मल्टीग्रेन चपाती खाण्यास पसंती दर्शवतात. गव्हाच्या पिठाची चपाती खाण्याचे फायदे अनेक आहेत. मात्र, चपातीचे कणिक मळण्यापासून ते शेकण्यापर्यंत अशा काही नकळत आपल्याकडून चुका घडतात, ज्यामुळे चपातीतील पौष्टिक घटक कमी होते. चपाती करताना कोणत्या गोष्टी टाळाल्या हव्या? चपाती करताना कोणती विशेष काळजी घ्याला हवी? पाहा(4 grave mistakes you are making when preparing chapatis).
कणिक मळल्यानंतर किती वेळानंतर चपाती तयार कराव्या?
सकाळची प्रत्येक घरात घाई असते. काहींना वेळेवर ऑफिस, कॉलेज किंवा शाळेवर पोहचायचं असतं. त्यामुळे बऱ्याच महिला चपातीची कणिक मळून झाल्यानंतर, त्याची चपाती लाटायला सुरुवात करतात. मात्र, असं करू नका. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर १५ मिनिटांसाठी कापड ठेवा. जेणेकरून कणिक फरमेण्ट होईल. त्यानंतर त्याच्या चपात्या लाटा. यामुळे गुड बॅक्टेरिया वाढतील, जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. शिवाय चपात्या मऊ, लुसलुशीत तयार होतात.
चकली तळताना तुटते, गार झाल्यावर खूप तेल सोडते? १ सोपी ट्रिक, चकल्या तेल पिणार नाहीत..
नॉन-स्टिक तवा
बऱ्याच महिला चपाती शेकण्यासाठी नॉन-स्टिक तव्याचा वापर करतात. चपाती शेकताना नॉन-स्टिक तव्याचा वापर शक्यतो टाळाच. चपात्या नेहमी लोखंडी तव्यावर शेका. लोखंडी तव्यावर शेकल्याने चपातीतील पौष्टीक घटक नष्ट होत नाही. शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
चपाती स्टोर करण्याची पद्धत
अनेक महिला चपाती शेकल्यानंतर अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवतात. पण असे करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. चपाती कधीच अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेऊ नका. त्याऐवजी कापडात गुंडाळून ठेवा.
कोणत्या पिठाची चपाती करावी?
बरेच फिटनेस फ्रिक लोकं निरोगी राहण्यासाठी, शिवाय वजन कमी करण्यासाठी मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या तयार करतात. पण ही पद्धत चुकीची मानली जाते. कारण एका वेळी एकाच पिठाची चपाती करायला हवी. आणि मुख्य म्हणजे गव्हाच्या पिठाच्या चपातीने वजन वाढत नाही. आपण कोणत्या पद्धतीने चपाती करत आहात, आणि कितीप्रमाणात खात आहात? या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.